आमचे बालवीर शिबिर निबंध मराठी
यंदा सातवीच्या अभ्यासात ‘स्काऊट’-बालवीर हा आमचा मोठा आवडता विषय होता. डिसेंबरमध्ये जवळच्याच ‘नेवाळे’ गावात दोन दिवस व दोन रात्री बालवीर शिबिर होते. आसपासच्या गावांतील चार-पाच शाळा नेवाळे येथील वनराईत जमल्या होत्या. तेथे एक प्राचीन देऊळ होते. त्याचे मोठे मोकळे आवार आमच्या स्वागतासाठी तयार होते.
त्या रात्री आम्ही बरोबर आणलेली भाजीपोळी खाल्ली आणि गप्पा मारत झोपी गेलो. सकाळी मात्र सरांच्या एका शिट्टीने जाग आली. सरांनी सर्व मुलांना एकत्र करून गट पाडले. सर्व शाळांतील मुले एकत्र करून हे गट पाडले होते. कामांची वाटणी करण्यात आली. गावात एक रस्ता तयार करायचा होता.
वनराईत स्वच्छता करायची होती. वेगवेगळ्या गटांना वेगवेगळे काम दिले होते. काहीजणांना स्वयंपाकही करावा लागला. शनिवारी सबंध दिवस आणि रविवारी अर्धा दिवस आम्ही काम केले.
शनिवारी रात्री ‘कॅम्प फायर’ चा कार्यक्रम खूप रंगला. खूप नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. रविवारी दुपारी गावकऱ्यांनी भोजन दिले. शिरापुरीचा बेत होता. शिबिर संपताना बालवीराची प्रतिज्ञा घेतली. नवीन संकल्प करून घरी परतलो.
पुढे वाचा:
- हॉकी वर मराठी निबंध
- हे विश्वची माझे घर निबंध
- हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी
- हुंडा एक सामाजिक समस्या
- हिरवी संपत्ती मराठी निबंध
- स्वावलंबन मराठी निबंध
- स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती
- स्वातंत्र्यानंतरचा भारत मराठी निबंध
- स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी
- स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध
- स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग निबंध मराठी
- स्पर्धेचे युग मराठी निबंध
- स्त्री शिक्षणाचे महत्व निबंध मराठी