हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी – Hundabali Streechi Aatmkatha Marathi

काय हे जीवन ? धिक्कार असो या जीवनाचा ! केवढ्या उमेदीने हा सुखाचा संसार मांडला आणि येईल त्या प्रसंगाला सामोरी जाण्यासाठी सज्ज झाले पण मला कोणीही साथ देवू शकले नाही. नशिबानेही लगेच पाठ फिरविली. दैव तर कधीच ‘दुर’ या शब्दाचा उपसर्ग जोडून निघून गेले होते पण असो. आता जगण्यात काही राम राहिला नाही हेच खरे. अशा दुर्दैवी स्त्रीची कथा ऐकायची आहे ना ! तर ऐक नीट.

केवढ्या श्रीमंत कुटूंबात माझा जन्म झाला होता ! माझ्या जन्माने माझ्या आईवडिलांना आनंदाचा बहर आला होता. बारा दिवसांनी उत्साहात माझे बारसे झाले. बाबांनी लाडाने ‘पायल’ नाव ठेवले अन् आईने ‘सपना’ पण दोघेही मला ‘गुड्डीच’ म्हणत. होतेच तशी त्यांची गुडिया मी ! माझे बालपण केवढ्या सुखात गेले. हवा तो हट्ट पुरविण्यास आईबाबा सदैव तत्पर असत. मी मागावे अन् त्यांनी दयावे असा जणू क्रमच लागुन गेला. शाळेतही त्यांनी सांगावे आणि मी जिद्दीने अभ्यास करुन प्रथम क्रमांक पटकवावा असे जणू दैवलिखितच होते.

योग्य वय झाल्यानंतर माझ्या बाबांनी माझ्यासाठी योग्य स्थळे पहाण्यास सुरुवात केली व पुण्याच्या देशपांडे यांचे स्थळ सांगुन आले. मुलगा इंजिनीअर असून घरचे सर्व ठिक आहे असे आम्हास समजले. बाह्य परिस्थिती समजली पण अंतर्थिती कोण अजमावू शकणार ? त्यानुसार मोठ्या थाटाने दोन लाख रुपये देवून माझ्या बाबांनी माझे लग्न लावून दिले. दोन दिवस मी सुखी होते पण तिसऱ्याच दिवशी माझ्या खडतर आयूष्याची सुरुवात झाली. माझ्या सासूबाई पदोपदी मला हिणवू लागल्या. माझ्या खोट्या कागाळ्या आपल्या मुलाजवळ करु लागल्या. तरीही मी स्तब्ध राहिले. वाटले, करु दे काहीही. आपल्या प्रेमाने आपण त्यांना समजाव पण बापाकडून पन्नास हजार व फ्रीज आणल्या शिवाय पाऊल टाकु नकोस’ असे धमकावून माझी पाठवणी माहेरी करण्यात आली. कोणत्या तोंडाने बाबांना सासरचे शब्द सांगू ! म्हणून मी गप्पच राहिले. वाटले, राहतील गप्प म्हणून बाबांकडून काहीही न घेता मी सासरी आले. सासुबाई घरात नसल्याने निदान उबरठा ओलांडून आता जावू शकले.

मी माहेरहून काही आणले नाही असे समजताच सासुबाईंनी मला मारण्यास प्रारंभ केला. मदतीला त्यांचा मुलगा म्हणजेच माझे पतीदेवही होते. दोघांनी मिळून मला खूप मारले व माझ्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. ओरडण्याची सोय नव्हती कारण बोळ्याने तोंड गच्च आवळले होते. अंगाचा दाह होत होता तरी मुकाट सोसत राहिले. पेटत आहे हे पाहून मायलेक घराला कुलूप लावून बाहेर गेले. माझी शुद्ध हरपत चालली आणि क्षणात मी कोसळून पडले.

केवढ्याशा कारणासाठी आपण किती मोठे पाप करीत आहोत याचा लवलेशही त्यांच्या तोंडावर नव्हता हे केवढे आश्यर्च ! मी आता मरणाच्या वाटेवर आहे परंतु देवाजवळ शेवटचे एकच मागणे मागते की अशा निष्ठूर लोकांच्या अंगी थोडी ममता देण्याची कृपा कर अशी कितीतरी उदाहरणे माझ्याप्रमाणे अनेक घरात घडत असतील. याला वाली कोण ? हुंडाबळी मुलीचे आईवडील या कृत्याचा जाब विचारण्यासाठी कुणापुढे पंदर पसरतील ? अशी निघृण कृत्ये करुन जगात वावरणारी माणसेच अधिक सुखी आहेत असे म्हणावेसे वाटते.

तेव्हा शेवटची इच्छा परमेश्वराजवळ व्यक्त करते की अशा नीच लोकांच्या मनी प्रेमाची सावली वसू दे. त्यांना न्यायाने वागण्याची बुद्धी दे.

हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी – Hundabali Streechi Aatmkatha Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply