हॉकी वर मराठी निबंध – Essay on Hockey in Marathi

लहान मुलांनी आणि अगदी मोठ्या माणसांनीसुद्धा कुठल्या ना कुठल्या खेळात आपले मन रमवलेच पाहिजे. खेळामुळे चांगला व्यायाम घडतो, मन प्रफुल्लित आणि उत्साही बनते. मानसोपचार तज्ञ तर म्हणतात की नको ती व्यसने लागणे खेळामुळे टळते, तसेच खेळात हार-जीत असते. त्यामुळे दोन्हीची सवय होऊन अंगात खिलाडू वृत्ती बाणवली जाते.

भारतात क्रिकेट, टेनीस, फुटबॉल, कबड्डी, खोखो, बुद्धिबळ इत्यादी अनेक खेळ खेळले जातात. हॉकी हा त्यातलाच एक खेळ आहे. तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपासून अगदी शालेय पातळीपर्यंतही खेळला जातो. खेळाचे मैदान मोठे आणि स्वच्छ असावे लागते. तिथे प्रेक्षकांना बसण्यासाठी पुरेशी जागाही असावी लागते. हॉकी खेळण्याचे साहित्य म्हणजे हॉकीचा चेंडू आणि प्रत्येक खेळाडूकडे एक अशा हॉकीच्या काठ्या.

ह्या खेळाचा सामना होतो तेव्हा दोन्ही संघात प्रत्येकी अकरा खेळाडूंना घेतले जाते. त्याशिवाय दोन पंचही असतात. सुरूवातीला दोन्ही कर्णधार नाणेफेक करतात. नाणफेक जो संघ जिंकतो त्याचा कर्णधार चेंडूला काठी मारतो आणि आपल्या साथीदाराकडे सरकवतो. अशा त-हेने चेंडू पुढे पुढे जात राहातो. काही काळाने तो चेंडू विरोधी संघाकडे जातो. त्यानंतर सामन्याला वेग येतो.

दोन्ही संघ एकमेकांवर गोल करण्यासाठी धडपडू लागतात. एखाद्या संघाचा गोल झाला की पलीकडच्या संघावरचा ताण वाढतो. मग तो गोल उतरवण्याचा प्रयत्न ते करू लागतात. कधीकधी एखाद्या खेळाडूच्या हातून चूक होते आणि त्यांना कॉर्नर मिळतो. तेव्हा त्या संधीचा फायदा उठवून ते आपल्यावरील गोल उतरवू शकतात. हॉकी खेळणा-या संघातील खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, एकजिनसीपणा आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती असेल तर त्यांचा खेळ चांगला होतो आणि ते विजय मिळवू शकतात. परंतु कधीकधी अटीतटीच्या खेळामुळे सामन्याचे मैदान म्हणजे युद्धभूमी बनते.मग एकमेकांवर चेंडूची आक्रमणे होऊ लागतात.

एके काळी हॉकी ह्या खेळात भारत सा-या जगात अग्रेसर होता. ध्यानचंद हे हॉकीपटू ऐन उमेदीत होते त्या काळात दर चार वर्षांनी होणा-या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये आपल्याला हॉकीचे सुवर्णपदक मिळत असे. आता मात्र तो इतिहास झाला आहे असे खेदाने म्हणावे लागते.

मी पाहिलेला हॉकीचा सामना – Mi Pahilela Hockey Cha Samna

विद्यार्थी जीवनात खेळांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे शारीरिक व्यायाम तर होतोच, त्याबरोबरच चातुर्य, मित्रत्व, खिलाडूपणा, बुद्धीची एकाग्रता पण वाढते. अंगी चपळपणा येतो. भारतात अनेक खेळ खेळले जातात. त्यापैकीच हॉकी हा एक आहे. हॉकी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर शालेय स्तरावरही खेळली जाते. या वर्षी फेब्रुवारीत डी. ए. व्ही स्कूल आणि महाराज अग्रसेन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांमधे . हॉकीचा सामना आर. डी. कॉलेजच्या मैदानावर सुरू झाला. मी हा सामना पहाण्यास गेलो होतो. मी डी.ए.व्ही. शाळेचा विद्यार्थी आहे. मैदान मोठे व स्वच्छ असून प्रेक्षकांना बसण्यासाठी पुरेशी जागा होती. दोन्ही संघ, शाळेचे विद्यार्थी, प्रेक्षक वेळेवर मैदानावर आले. दोन्ही संघांत ११/११ खेळाडू होते. त्याठिकाणी दोन पंचही होते.

दोन्ही संघांच्या कप्तानांनी नाणेफेक करून टॉस केला, टॉस महाराज अग्रसेन विद्यालयांने जिंकला आणि चेंडूला पहिली स्टीक मारली व आपल्या दुसऱ्या साथीदाराकडे चेंडू सरकावला. अशा प्रकारे चेंडू पुढे पुढे जात राहिला. थोड्या वेळाने चेंडू विरोधी संघाकडे गेला. हळू-हळू सामन्याला वेग आला. दोन्ही संघ एकमेकांवर गोल करण्यासाठी धडपडू लागले. खेळ सुरू झाल्यावर १५ मिनिटांनी अग्रसेन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पहिले यश मिळाले. त्यांनी डी. ए. व्ही. स्कूलवर पहिला गोल केला. डी.ए.व्ही. च्या खेळाडूंवरचा ताण वाढला आणि ते गोल उतरविण्यासाठी विरोधी संघाच्या डी-जवळ घोटाळू लागले. पण मध्यंतरापर्यंत त्यांना यश मिळाले नाही.

मध्यंतराची वेळ संपल्यानंतर डी. ए. व्ही. शाळेच्या एका विद्यार्थ्याची चूक झाली. ए आणि त्यांना कॉर्नर मिळाला. या संधीचा त्यांनी फायदा उठविला आणि गोल केला. दोन्ही संघ बरोबरीत आले. प्रेक्षकांच्या टाळ्यांनी मैदान दुमदुमले. प्रेक्षक दोन्ही संघांना उत्तेजन देत होते. बरोबरीपर्यंत पोहोचल्यावर डी. ए. व्ही. शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि ते जिंकण्यासाठी उत्सुक झाले. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, संघटन आणि एकमेकांना समजण्याची चांगली योग्यता असल्यामुळे डी. ए. व्ही. ने शेवटच्या दहा मिनीटात दुसरा गोल केला. खेळ युद्धाचे मैदान बनले आणि एकमेकांवर चेंडूने आक्रमणे होऊ लागली. अनेक प्रयत्न करुनही महाराज अग्रसेन विद्यालयाला गोल उतरविता आला नाही. वेळ संपल्याची शिट्टी वाजविण्यात आली व डी. ए. व्ही. विद्यालयास विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या संघाने खिलाडूपणे डी. ए. व्ही. चा कॅप्टन व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जिंकलेल्या संघाला ट्रॉफी व दुसऱ्या संघाला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. उत्कृष्ट खेळाडूंना वेगळी बक्षिसे दिली गेली.

आमचा संघ बाहेर येताच इतर विद्यार्थ्यांनी त्यांना खांद्यावर उचलले व आपला आनंद व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी प्रार्थनेच्या वेळी मुख्याध्यापकांनी सगळ्या शाळेसमोर त्यांना शुभेच्छा आणि प्रशस्तिपत्रे दिली. त्यांनी जिंकलेला कप सर्व विद्यार्थ्यांना दाखविला.

हॉकी वर मराठी निबंध – Essay on Hockey in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply