एका मंदिराचे वर्णन मराठी निबंध
एका दिवशी मी माझ्या आईसोबत बिरला मंदिरात गेलो. हे दिल्लीतले प्रसिद्ध मंदिर आहे. याला लक्ष्मीनारायण मंदिर असे देखील म्हणतात. मंदिर गोल मार्केटजवळ आहे. हे मोठे आणि विशाल आहे आणि दूरवरूनच दिसायला लागते. लक्ष्मी आणि नारायणाची इथे भव्य प्रतिमा आहेत. दुसऱ्या देवी-देवतांच्या मुर्त्या पण आहेत.
मंदिर एका उंच ठिकाणी बांधलेलं आहे आणि पायऱ्या चढून जावे लागते. सर्वप्रथम आम्ही भगवान लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेतले. नंतर हार आणि वेळा प्रदशिणा घातला प्रदक्षिणा घालताना माझी आई विष्णू सहास्त्रनामाचा जप करीत होती.
सर्व ठिकाणी उदबत्ती आणि फुलांचा सुगंध दरवळत होता. मिठाईचा सुगंध पण त्यात मिसळलेला होता. फारच मोहक दृष्य होतं. शेकडोच्या संख्येत श्रद्धाळू तिथे उपस्थित होते. असे असले तरी त्या दिवशी कसला उत्सव वगैरे नव्हता. नाहीतरी मला गर्दी आवडतच नाही. परंतु तसे काही वाटले नाही. पहाता-पहाता सायंकाळच्या आरतीची वेळ झाली. गर्दी अधिकच वाढली. तसेच देखावा अधिकच विलोभनीय झाला.
घंटे, वाजंत्री, आणि इतर वाद्यांसहित आरतीला सुरूवात झाली. पुजाऱ्याने मोठ्या श्रद्धा भावाने पूजा-आरती केली. सारे वातावरण लक्ष्मीनारायणाच्या जय-जय काराने दुमदुमले. सर्व एका स्वरात आरती गीताचा ध्यान लावून उच्चारण करीत होते. मन आपोआपच ध्यानमग्न होऊ लागलं होतं.
पुढे वाचा:
- आमचे बालवीर शिबिर निबंध मराठी
- हॉकी वर मराठी निबंध
- हे विश्वची माझे घर निबंध
- हुंडाबळी स्त्रीचे आत्मवृत्त मराठी
- हुंडा एक सामाजिक समस्या
- हिरवी संपत्ती मराठी निबंध
- स्वावलंबन मराठी निबंध
- स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती
- स्वातंत्र्यानंतरचा भारत मराठी निबंध
- स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी
- स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध
- स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग निबंध मराठी