क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे मराठी निबंध

समर्थ रामदासांनी अखिल मानवाच्या कल्याणासाठी अनेक उपदेशपर सुवचने लिहिली आहेत. कर्म करणाऱ्यांपेक्षा केवळ बडबड करणाऱ्या व्यक्तींना, ‘आधी करा, मग सांगा’ असा संदेश सांगितला आहे.

व्यक्तीच्या बोलण्याला कृतीची जोड असेल, तर त्या व्यक्तीला समाजात मान-सन्मान मिळतो, महत्त्व प्राप्त होते. केवळ पोपटासारख्या गप्पा मारणाऱ्या व्यक्ती समाजात कुणाच्याच उपयोगी पडत नाहीत. त्यांचे बोलणे म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ असे असते. बाष्कळ गप्पा मारणाऱ्या व्यक्तींवर कोणीच विश्वास ठेवत नाही. माणसाने नेहमी ‘कणभर बोलावे आणि मणभर करावे’ असे म्हटले जाते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, गरिबांची आई मदर तेरेसा, दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील, कुष्ठरोग्यांसाठी महान कार्य करणारे बाबा आमटे, गावेच्या गावे स्वतः स्वच्छ करून आपल्या कृतीतून स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संत गाडगेबाबा इत्यादी महान, कर्तृत्वसंपन्न, ध्येयवादी, कर्मयोगी विभुतींनी आपल्या कृतीतून जगाला उपदेश देऊन ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ हा संत तुकारामांनी दिलेला उपदेश सार्थ करून दाखविला.

पुढे वाचा:

Leave a Reply