माझी आवडती भाजी निबंध मराठी

आई सांगते भाज्या खात जा. कोबी, भेंडी, पालक, मेथी ह्या सगळ्या भाज्या ती करते. पण मला मात्र सगळ्यात जास्त बटाट्याची भाजी आवडते. बटाट्याची भाजी कशाही प्रकारे केली तरी मला आवडते. ती फार चविष्ट लागते. जेवणात ही भाजी असली की मी पोटभर जेवतो. भाज्या खाल्ल्यामुळे तब्येत चांगली राहते. आजारपण येत नाही. म्हणून मी इतरही भाज्या खातो. भाजी खाल्ल्यामुळे ताकद येते आणि मी शेजारच्या रामप्रमाणे आजारी पडत नाही. माझा अभ्यास व खेळणे बुडत नाही. म्हणून सगळ्यांनी भाज्या खा व मजेत रहा.

पुढे वाचा:

Leave a Reply