Set 1: माझा वाढदिवस मराठी निबंध – Essay on My Birthday in Marathi
Table of Contents
दि. २७ मार्च हा माझा वाढदिवस. माझे आईवडील माझा वाढदिवस खूप थाटामाटात साजरा करतात. वाढदिवसाला मला अकरावे वर्ष पूर्ण होऊन बारावे लागले. मी त्या दिवशी वर्गातल्या मुलांना दोन दोन चॉकलेटस्, दोन पेन्सिली व एकेक खोडरबर दिले.
दुपारी मी माझ्या काही मित्रांना घरी बोलावले. आईने खोली रंगीबेरंगी पट्ट्यांनी, फुग्यांनी सजविली होती. माझ्यासाठी आईने केक केला होता. मी मेणबत्ती फुकून केक कापल्यावर आईने सर्वांना केक, चिवडा व गुलाबजाम दिले. माझ्या मित्रांनी माझ्यासाठी छोट्या छोट्या भेटवस्तू आणल्या होत्या. बाबांनी माझ्यासाठी कॅरमबोर्ड आणला होता. मी व माझे मित्र थोडा वेळ कॅरम खेळलो. मग सर्वजण आपापल्या घरी गेले. अशा प्रकारे तो वाढदिवस आनंदाने पार पडला.
Set 2: माझा वाढदिवस मराठी निबंध – Essay on My Birthday in Marathi
माझा वाढदिवस २६ जानेवारीला असतो. माझी आई वाढदिवसाला गोड गोड पदार्थ करते. माझे वडील मला त्या दिवशी नवीन कपडे आणतात. माझे मित्र आणि इमारतीमध्ये रहाणारी मुले संध्याकाळी घरी येतात. त्या दिवशी सकाळी मी देवाची प्रार्थना करतो व संध्याकाळी मित्रांना खाऊ व भेटवस्तू देतो. माझे मित्रही मला भेटवस्तू देतात.
आजी, आजोबा मला आशिर्वाद देतात. या दिवशी माझे घर सुंदर सजवलेले असते. गाणी लावून आम्ही सर्व त्या तालावर नाचतो. माझ्या वाढदिवसाला मजाच मजा असते.
Set 3: माझा वाढदिवस मराठी निबंध – Essay on My Birthday in Marathi
मला वर्षातील एक दिवस खूप आवडतो. त्या दिवसाची मी अगदी आतुरतेने वाट पाहात असते. तो दिवस म्हणजे माझा वाढदिवस होय. माझा वाढदिवस शाळा चालू असतानाच्या काळात येतो म्हणून मला बरे वाटते कारण त्या दिवशी मला शाळेचा गणवेष नघालता नवा फ्रॉक घालून शाळेत जाता येते.
त्या दिवशी घरी तर माझे खूप लाड होतात. आई मला आवडणारी पुरणपोळी करते. बाबा मला नवीन पुस्तक विकत आणतात तसेच मला चॉकलेटही आणतात. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी आजी मला ओवाळते आणि बक्षीस म्हणून शंभर रूपये देते. आजोबाही मला जवळ घेऊन माझे लाड करतात.
शाळेत तर काय मजाच असते. माझ्या वर्गशिक्षिका आणि इतर मुले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. शाळेत वाटण्यासाठी मी पेन्सिली किंवा तशीच दुसरी कुठलीतरी वस्तू आणलेली असते. ती वस्तू आणि सोबत एकेक चॉकलेट सर्वांना देताना मला खूप आनंद होतो.
त्या दिवशी जणू मी राणीच असते कारण घरी किंवा शाळेत कुणीच माझ्याशी भांडत नाही किंवा मला रागावत नाही. असा हा वाढदिवस लौकर संपतो म्हणून मला वाईट वाटते. कारण पुन्हा एक वर्षभर त्याची वाट पाहावी लागते ना.नाही. असा हा वाढदिवस लौकर संपतो म्हणून मला वाईट वाटते. कारण पुन्हा एक वर्षभर त्याची वाट पाहावी लागते ना.
Set 4: माझा वाढदिवस मराठी निबंध – Essay on My Birthday in Marathi
मी यंदा इयत्ता पाचवीत आहे. मला ह्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात वयाची अकरा वर्षे पूर्ण होणार. मी वाढदिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहातो कारण त्या दिवशी आपण कुणी तरी खास माणूस बनतो. आमच्या शाळेत वाढदिवसाच्या दिवशी गणवेष न घालता नवे कपडे घालून येण्याची परवानगी आहे. त्यामुळे त्या दिवशी नवे कपडे घालून शाळेत जाताना अगदी खासच वाटते.
आम्ही सर्वजण वाढदिवसाला वर्गात केक किंवा चॉकलेट वाटतो. पूर्वी शाळेत पेन्सिली, खोडरबर वगैरे वस्तूही आम्ही वाटत असू परंतु आता शाळेने ती पद्धत बंद केली आहे. फक्त केक किंवा चॉकलेट वाटायलाच आता परवानगी आहे.
वाढदिवसाच्या संध्याकाळी तर आमच्या घरी खूपच मज्जा असते. माझी आई स्वतः आपल्या हातांनी केक बनवते. गेल्या वर्षी तिने छान परडीच्या आकाराचा केक बनवला होता आणि त्यावर आयसिंग क्रिमने गुलाबाची फुले तयार केली होती. ह्या वर्षीही आई केक बनवेल. पण त्याचा आकार कुठला असेल हे मात्र अजून गुपितच आहे. बाबा पण त्या दिवशी लौकर घरी येतात. माझी मावशी जवळच राहाते.ती, तिचे यजमान आणि अमित-सुमित ही तिची दोन्ही मुले त्या दिवशी आमच्या घरी येतात. शिवाय कॉलनीत राहाणारी माझी मित्रमंडळी तर असतातच. सगळे जमले की मी केक कापतो, आईने सर्वांसाठी पावभाजी, पाणीपुरी, मिसळ, सामोसे, चाट अशासारखे चटपटीत पदार्थ बनवलेले असतात. केक कापल्यावर आम्ही सर्वजण त्या पदार्थांचा आस्वाद घेतो. सर्वांना माझ्या आईच्या हातचे पदार्थ आवडतात.
वाढदिवसाबाबतची मला सर्वात आवडणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे मला त्या दिवशी खूप भेटवस्तू मिळतात. त्या वस्तूंवर लावलेला चंदेरी कागद उघडून आत काय वस्तू दिली असेल ह्याची मला कोण उत्सुकता लागून राहिलेली असते.वाढदिवसाच्या दिवशी सगळे लोक माझे कौतुक करतात, मुख्य म्हणजे माझी आई मला ओवाळते त्यामुळे माझा वाढदिवस अगदी लक्षात राहाण्यासारखा होतो.
Set 5: माझा वाढदिवस मराठी निबंध – Essay on My Birthday in Marathi
आपल्या भारत देशात वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आहे. आता तर हा एक रिवाजच बनला आहे. नेत्यांचे वाढदिवस मोठ्या प्रमाणावर आणि सामान्य व्यक्तींचे वाढदिवस कौटुंबिक स्तरावर साजरे केले जातात.
आज २६ जानेवारी, माझा वाढदिवस आहे. मी १० वर्षांची आहे. वाढदिवसाचा दिवस माझा सर्वात आनंदाचा दिवस असतो. माझ्या कुटुंबातील सर्वांनी सकाळीच मला शुभेच्छा दिल्या. यावर्षी मी माझ्या मैत्रिणींना, जवळच्या काही नातेवाईकांना वाढदिवसाला बोलावले आहे.
सकाळीच शाळेत गेल्यावर. माझ्या वर्ग शिक्षिका आणि वर्गातील मित्र-मैत्रिणींना मिठाई वाटली. सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझे स्वागत केले व मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
संध्याकाळी माझ्या मित्र-मैत्रीणी व काका-काकू मावशी, माझ्या बहिणी असे बरेच लोक जमले. आईने सगळे घर फुगे व रंगीत माळांनी सजवले होते. वाढदिवसानिमित्त माझ्या मित्र मैत्रिणींनी सुंदर-सुंदर भेटी दिल्या, काका-काकूनी माझ्या दीर्घायुष्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना केली. जे स्नेही येऊ शकले नाहीत त्यांनी शुभेच्छा पत्रे पाठविली.
त्यानंतर मी केक कापला. माझी मैत्रीण गीताने गाणे म्हटले. सर्वांनी टाळ्या वाजवून तिच्या गाण्याला दाद दिली व गाण्याचा आनंद लुटला. रोहित आणि अरविंदने मिळून एक विनोदी नाटिका सादर केली. ती सर्वांना आवडली. कार्यक्रमात मधून-मधून खाणे चालूच होते. रात्री नऊ वाजता सगळे आपाल्या घरी परत गेले. नंतर मी मिळालेल्या सर्व भेटी उघडून पाहिल्या. त्यात काही पुस्तके, एक घड्याल व बरेचसे खेळ होते. मी ईश्वराजवळ वाढदिवस पुन्हा लवकर यावा अशी प्रार्थना केली.
Set 6: माझा वाढदिवस मराठी निबंध – Essay on My Birthday in Marathi
आम्ही चार भावंडे आहोत. मला तीन बहिणी आहेत. त्या सर्व माझ्याहून मोठ्या आहेत. तिघीनंतर माझा जन्म झाला. तात्पर्य मी घरात सर्वात छोटा आणि लाडका आहे. माझे आई-वडील तसे माझ्यात आणि बहिणीत कसलाही भेदभाव करीत नाहीत. सर्वांचा सारखा लाड करतात.
माझा जन्म मार्च महिन्यातल्या ७ तारखेला झाला होता. याच दिवशी माझा वाढदिवस असतो. माझा वाढदिवस दरवर्षी साजरा केला जातो. घरात मोठीच धावपळ आणि प्रसन्नतेचं वातावरण असतं. एक दिवस आधीच तयारी सुरू होते. निमंत्रण पत्रिका वाटल्या जातात आणि जवळचे मित्रमंडळी तसेच नातेवाईकांना बोलावले जाते.
माझ्या वाढदिवसानिमित्त मला आणि माझ्या आई-वडिलांना सुभेच्छा मिळतात. लोक मला दीर्घायुष्याच्या सुभेच्छा देतात. माझे मित्र पार्टीमध्ये सहभागी व्हायला येतात तसेच येताना मला देण्यासाठी सुंदर-सुंदर गिफ्ट पण आणतात. जे येऊ शकत नाहीत ते आपल्या सुभेच्छा तसेच भेट वस्तू पोस्टाने किंवा एखाद्याजवळ पाठवून देतात.
केक कापणे आणि मेणबत्ती विझवताना टाळ्यांचा कडकडाट होतो. नंतर सर्वजण केकचा तुकडा खातात आणि नंतर दुसरे पदार्थ आदी. थंड पेय देखील मनसोक्त पिले जातात. जे चहा-पितात त्यांना चहा दिल्या जातो. माझे वडील मला छान-छान भेटवस्तू तर देतातच पण सोबतच रोख रक्कमही देतात. ती मी माझ्या बँक खात्यात जमा करते. माझ्या तिन्ही बहिणीसाठी हा आनंद आणि खास दिवस असतो. त्यांचे वाढदिवस देखील साजरे केले जातात. पण इतक्या खर्चाचे नाही. अनेकदा मी असा विचार करते की वाढदिवस वर्षातून एकदाच का येतो. .
पुढे वाचा:
- माझा वर्ग निबंध मराठी
- माझा मामा निबंध मराठी
- माझा भारत महान निबंध मराठी
- माझा भाऊ निबंध मराठी
- माझा छंद बागकाम निबंध मराठी
- माझा गाजलेला छंद निबंध मराठी
- माझा आवडता सण निबंध मराठी
- माझा आवडता सण विजया दशमी निबंध
- माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध
- माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध मराठी
- माझा आवडता विषय मराठी निबंध
- माझा आवडता विषय इतिहास
- माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध