Set 1: माझा वर्ग निबंध मराठी – My Classroom Eassy in Marathi
मी हिंद विद्या मंदिर शाळेत जाते. आमचा वर्ग चौथी अ असून आम्ही साठ मुले वर्गात आहोत. साठापैकी बत्तीस मुलगे असून आम्ही मुली अठ्ठावीस आहोत. आमचा वर्ग हुशार मुलांचा वर्ग असल्यामुळे सर्व शिक्षक आमचे खूप लाड करतात.
आमच्या वर्गात मुलांचा मॉनिटर वेगळा आहे आणि मुलींची मॉनिटर वेगळी आहे. एखादे शिक्षक रजेवर असल्यामुळे आम्हाला मोकळा तास मिळतो तेव्हा आम्ही वर्गात दंगा करतो. तेव्हा आम्हाला शांत करताना आमच्या दोन्ही मॉनिटर्सची खूपच कसोटी लागते.
अशा वेळी पुस्तकांची पेटी ते दोघे आम्हाला आणून देतात मग आम्ही छान छान पुस्तके वाचण्यात गुंग होतो. कधीकधी वर्गातील मुलामुलींत भांडणे होतात. परंतु नंतर ती भांडणे आम्ही विसरतो आणि पुन्हा एक होतो.
आमच्या वर्गात पुढल्या बाकावर सगळी हुशार मुले बसतात तर मस्तीखोर आणि दंगेखोर मुले मागच्या बाकावर बसू पाहातात. पण आमच्या शिक्षकांना कुठले मूल कसे आहे ते चांगले माहिती असते.
आम्ही वर्गाचे हस्तलिखित मासिक ‘ किलबिल’ ह्या नावाने तयार केले. त्या मासिकाला पहिला क्रमांक मिळाला. असा आमचा वर्ग मला खूप आवडतो.
Set 2: माझा वर्ग निबंध मराठी – My Classroom Eassy in Marathi
माझी शाळा गावापासून दूर आहे आणि आमचा इयत्ता ६वीचा वर्ग १ल्या मजल्यावर आहे.
आमच्या वर्गाला एकूण पाच खिडक्या आहेत. त्यामुळे भरपूर हवा व सूर्यप्रकाश वर्गात येतो. एकूण २५ बाके वर्गात आहेत. दोन मोठे, आधुनिक, काचेचे फळेही आहेत. पंखे व ट्यूबलाईटचीही व्यवस्था आहे. आमच्या वर्गात एकूण २५ मुले व २५ मुली आहेत. आमच्या वर्गशिक्षिकेचे नाव शोभना मॅडम आहे. त्या इतिहास खूप चांगला शिकवितात. आमचा वर्ग नेहमीच अतिशय स्वच्छ व नीटनेटका असतो. आम्ही कधीच कचरा खाली टाकत नाही.
वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळी आम्ही आमचा वर्ग सजवितो. मागच्या वर्षी आमच्या वर्गाला चांगल्या सजावटीबद्दल बक्षीस मिळाले आहे.
आमच्या वर्गातील फळ्यावर रोज सुविचार लिहिला जातो. भिंतीवर अनेक विषयांशी संबंधित तक्ते, नकाशे टांगलेले आहेत. महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरु यासारख्या थोर महापुरुषांची चित्रे टांगलेली आहेत. शाळा सुटल्यावर आमच्या वर्गातील दिवे व पंखे बंद करण्याची आम्ही काळजी घेतो.
पुढे वाचा:
- माझा मामा निबंध मराठी
- माझा भारत महान निबंध मराठी
- माझा भाऊ निबंध मराठी
- माझा छंद बागकाम निबंध मराठी
- माझा गाजलेला छंद निबंध मराठी
- माझा आवडता सण निबंध मराठी
- माझा आवडता सण विजया दशमी निबंध
- माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध
- माझा आवडता सण गणेश चतुर्थी निबंध मराठी
- माझा आवडता विषय मराठी निबंध
- माझा आवडता विषय इतिहास
- माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध
- माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध