Set 1: माझा भारत महान निबंध मराठी – Maza Bharat Mahan Nibandh Marathi

मी भारतीय आहे, याचा मला अभिमान आहे. माझा भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता.

भारतात भौगोलिक विविधता आहे. भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्ये, फळे, भाज्या, फुले यांच्यातही विविधता आढळते.

भारत हा जसा वीरांचा, शूरांचा देश आहे, तसाच तो संतांचाही देश आहे. भारतात विविध धर्माचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात. या सर्व भाषांतील साहित्य समृद्ध आहे.

भारताने दीडशे वर्षे गुलामगिरी साहिली. तेव्हा एकजूट करून भारतीयांनी लढा दिला व १९४७ साली स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत विकास साधला. या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड दयावे लागले आहे. पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यांवर मात करतात.

मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे. त्यामुळे भारत विविध क्षेत्रांत सतत प्रगती साधत आहे. आज अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वावलंबी आहे. औदयोगिक, वैज्ञानिक क्षेत्रांत जगात अग्रेसर बनला आहे. माझा भारत खरोखर महान आहे.

Set 2: माझा भारत महान निबंध मराठी – Maza Bharat Mahan Nibandh Marathi

भारत माझा देश आहे. त्यास हिंदूस्थान असेही म्हटले जाते. भारत आशिया खंडात आहे. याच्या उतरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला, हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. पाकिस्तान, बांगला देश, चीन हे शेजारी राष्ट्र आहेत. येथील ७० % लोक खेड्यांत राहतात.

व चीननंतर भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे. बहुसंख्य हिंदू असणारे राष्ट्र असूनही इथे सर्वधर्मसमभाव आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन सगळेच आपापसांत प्रेमाने राहतात. सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. इथे अनेक जाती व अनेक भाषा बोलल्या जातात. परंतु राष्ट्रभाषा मात्र हिंदी आहे. अनेक प्रकारचे रीतिरिवाज, वेशभूषा येथे दिसते. राजा हरिश्चंद्र, शिबी राजा, रामासारख्या सत्यवचनी राजांनी या धरतीला पवित्र केले. चाणक्यासारखा मुत्सद्दी आणि विदुरासारखे नीतिमान पण या भारतात होऊन गेले.

भारतात गंगा, यमुना, सरस्वतीसारख्या नद्या, हिमालय पर्वत, जगातील सात आश्चर्यापैकी एक ताज महाल, लाल किल्ला, अजिंठा वेरुळच्या लेण्या, कुतुबमिनार ही देशातील वास्तुकलेची उत्कृष्ट उदाहरणे होत. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गाव चेरापुंजी भारतातलेच. निसर्ग सौंदर्याचा अतिसुंदर आविष्कार काश्मीर, सिमला, मसुरी, माऊंट अबू या सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पाहावयास मिळतो. विदेशी पर्यटकांना ही सर्व ठिकाणे आकर्षित करतात.

येथे लोखंड, कोळसा, तांबे, नैसर्गिक वायू, युरेनियम इत्यादी खनिजे विपुल प्रमाणावर सापडतात. आज भारत औद्योगिक क्षेत्रातही प्रगतीच्या मार्गावर आहे. टी.व्ही. रेडिओ. मोटारी, बस, ट्रक, रेल्वे, जहाजे, दारुगोळा, क्षेपणास्त्र निर्मितीत भारत स्वयंपूर्ण झाला आहे.

भारत हा जगातील सर्वात प्रमुख लोकशाही देश आहे. भारताला आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. सर्वांगीण प्रगती झाल्यामुळे भारत आज आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश बनला आहे.

Set 3: माझा देश भारत निबंध मराठी – Maza Desh Bharat Nibandh Marathi

माझ्या देशाचे नाव भारत आहे. देशात शंभर करोड पेक्षा जास्त स्त्री-पुरुष-बालके राहातात. हा त्या सर्वांचा देश आहे. ही लोकसंख्याच देशाची ताकद आहे, मर्यादा आहे, मर्यादा देखील, चीन नंतर भारतच लोकसंख्येसाठी पहिल्या नंबरवर असेल. जगात सहा व्यक्तीनंतर एक व्यक्ती भारतीय आहे.

भारत महान आहे, विशाल आहे, खरोखरोच अद्भूत, जगातील सर्व धर्माची माणसं इथं राहातात. हिंदू, बौद्ध, जैन, शिख धर्म तर इथेच जन्माला आले. विविधतेत एकता हे भारताचे विलक्षण उदाहरण आहे. उत्तीरेत काशीपासून दक्षिण कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेत गुजरातपासून पूर्वेकडे गुवाहाटीपर्यंत भारत एक आहे. उत्तरेस पर्वतराज हिमालय थाटात उभा आहे. त्याची शिखरे जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. ते नेहमी बर्फाने अलंकृत होत असतात. याच्या खाली विशाल सागर आहे. हिमालयातून अनेक नद्यांचा उगम होतो. इथे सर्व प्रकारचे हवामान आहे.

भारताचा इतिहास फारच प्राचीन आहे. सिंधू संस्कृती आणि रामायण काळापासून आतापर्यंत हजारो वर्षाचा इतिहास आहे. प्राचीन काळात याला सोन्याची खान म्हटले जायचे. आज हा प्रगतीच्या मार्गावरून मार्गक्रमण करू लागला आहे. भारताने अनेक महान पुरूषांना जन्म दिला आहे. प्राचीन काळात गौतम बुद्ध झाले तर वर्तमान काळात महात्मा गांधी. या दरम्यान शेकडो महान स्त्री-पुरुष जन्मले.

माझा भारत महान निबंध मराठी – Maza Bharat Mahan Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply