माझा मामा निबंध मराठी – Maza Mama Essay in Marathi

आईच्या भावाला मामा म्हणतात. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मामाच्या गावाला जातो. आम्हाला मामा न्यायला येतो. मी आणि ताई महेशमामाबरोबर त्याच्या गावी जातो. माझ्या मामाचे गाव कोकणात आहे. कोकण रेल्वेने जाताना खूप मजा येते. गावाला गेलो की आंबे, फणस, काजू अशी अनेक फळे खायला मिळतात. महेशमामा आम्हाला होडीतूनही फिरवतो.

तो वेगवेगळे पक्षी, झाडे, फुले दाखवतो. त्यांचे महत्वही सांगतो. माझ्या मामाच्या घरामागे खूप मोठी वाडी आहे, विहीर आहे. विहीरीवर रहाटगाडगे आहे. त्यातून संपूर्ण वाडीला पाणी पुरवले जाते म्हणून वाडी हिरवीगार दिसते.

माझा मामा चंदामामासारखा सुंदर, प्रेमळ व शांत आहे. आमची मामीही आमची काळजी घेते. पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही मामा आणि मामीला आमच्या घरी बोलाविले आहे. मला माझा मामा खूप खूप आवडतो.

पुढे वाचा:

Leave a Reply