Set 1: माझा भाऊ निबंध मराठी – My Brother Essay in Marathi

मला एक मोठा भाऊ आहे. त्याचे नाव निखील. तो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. मी त्याला दादा म्हणते. तो कधीकधी माझ्यावर दादागिरी करतो. मला चिडवतो आणि रडवतोसुद्धा. कधीकधी मीसुद्धा आईकडे त्याची तक्रार करते मग त्याला आईचा ओरडाखावा लागतो.

परंतु असे जरी असले तरी आमचे एकमेकांवर पुष्कळ प्रेमही आहे. आम्ही भांडतो आणि पुन्हा एकत्र होतो. ” तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना” असेच आमचे आहे.

तो मुलगा आणि मी मुलगी म्हणून कसलाही भेदभाव आमच्या घरात केला जात नाही. आम्ही दोघेही मिळून आईला मदत करतो. आम्ही एकाच शाळेत जातो.

शाळेत मी पहिल्यांदा गेले तेव्हा मला अजिबात रडू आले नाही कारण माझा दादा त्याच शाळेत आहे हे मला माहिती होते.

आई आम्हाला पॉकेटमनीचे पैसे देते ते आम्ही साठवून ठेवतो. मगसुट्टीमध्ये त्या पैशातून आम्ही खेळणी आणि खाऊ घेतो.

दादाला चौथीची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यामुळे त्याच्यावर सगळेजण खुश झाले होते. मी पुढल्या वर्षी चौथीत जाईन तेव्हा मलाही त्याच्यासारखी शिष्यवृत्ती मिळावी असे वाटते. मला अभ्यासात आलेल्या शंका तोच सोडवायला मदत करतो. म्हणून माझा दादा मला आवडतो.

दादा हा माझा आदर्श आहे.

Set 2: माझा भाऊ निबंध मराठी – My Brother Essay in Marathi

मी ११ वर्षांची आहे. पण माझा भाऊ अहो, दादा ! हां, मी त्याला दादा म्हणते. तो ९ वर्षांचा आहे. पण मी त्याला दादा म्हणते. दादा दिसायला गोरापान आहे. तो स्वभावाने प्रेमळ व साधा आहे. तो तितकाच मस्तीखोर आहे. तो इयत्ता चौथीत माझ्याच शाळेत शिकतो. त्याच्या बाई नेहमी त्याचे कौतुक करतात. तो अभ्यासात हुशार आहे. तो खेळातही खूप हुशार आहे. तो आईची छोटी मोठी कामेही करतो. कधी कधी आमचे भांडणही होते. पण थोड्याच वेळात आम्ही राग विसरून परत खेळायला लागतो. दादाचे आम्ही सर्वजण लाड करतो. तो क्रिकेट छान खेळतो.

तो छान छान गाणीही म्हणतो. त्याला खूप बक्षीसेही मिळतात. दिवाळी म्हणजे घरासमोर नुसता आवाजच आवाज. एवढे फटाके तो फोडतो. मी त्याला रक्षाबंधनाला राखी बांधते. तो लहान असूनसुद्धा मला आवडती भेटवस्तू देतो. त्याला नेहमी माझ्याच वस्तू घ्यायला आवडतात. माझा दादा मला खूप आवडतो.

माझा भाऊ निबंध मराठी – My Brother Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply