नौली क्रिया मराठी माहिती – Nauli Kriya Information in Marathi
Table of Contents
नौली क्रिया कृती
- दोन्ही पायात एक फुटाचे अंतर ठेवून उभे रहा.
- थोडे पुढे वाकून पाय गुडघ्यात वाकवा. दोन्ही हात मांडीवर किंवा गुडघ्यावर ठेवा.
- मान व पोटाचे स्नायू पूर्ण ढिले ठेवा. श्वास पूर्णपणे बाहेर सोडून रोखून ठेवा व छाती फुगवीत मिथ्या श्वास घेतल्याचा आर्विभाव करीत (Mock Inhalation) उचकी लागल्यासारखे करून पोट खपाटीस न्या व या स्थितीत थोड वेळ स्थिर रहा.
- हाताने मांडीवर जोर देऊन पोटाच्या स्नायूंना पुढे धक्का द्या म्हणजे पोटाचे नळ पुढे येतील. यास मध्यनौली म्हणतात. जोपर्यंत विनासायास श्वास रोखून ठेवता येणे शक्य आहे तोपर्यंत मध्यनौली करून मग पूर्वस्थितीत या.
- पूर्वस्थितीत येताना प्रथम मांडीवरील हाताचा दाब कमी करा म्हणजे नळ आपोआप मागे जाऊन पोट उडिडयानस्थितीत राहील. मग पोटाचे स्नायू ढिले सोडून श्वास घ्या व मांडीवरील हात काढून उभे रहा. अशा रीतीने दररोज तीन ते चार आवृत्या करा.
नौली क्रिया करताना घ्यायची काळजी किंवा दक्षता
1) उडिडयान करून पोटाच्या स्नायूंना पुढे धक्का देऊन जर नळ पुढे येत नसतील तर वेडावाकडा प्रयत्न करून नळ पुढे आणण्याचा प्रयत्न न करता काही दिवस उडिडयानबंधाचा अभ्यास वाढवून मग नौलीचा अभ्यास सुरू करा.
2) नळ पुढे काढण्यासाठी मांडीवर जोरात दाब देऊ नये. मांडीवर नुसता धडाचा भार टाकला तरी नळ पुढे येतात.
3) पहिल्या आवृत्तीनंतर श्वासोच्छ्वास स्वाभाविक झाल्यावरच पुढील आवृत्ती करा.
4) मध्यनौलीचा अभ्यास नीट साधल्यावरच वाम व दक्षिणनौलीचा अभ्यास करा.
वामनौली क्रिया मराठी माहिती
वामनौली क्रिया कृती
1) उभे राहून मध्यनौली करा.
2) मध्यनौली केल्यावर उजव्या मांडीवरील हाताचा भार कमी करून फक्त डाव्या मांडीवर भार द्या म्हणजे नळ डाव्या बाजू स्थिर राहतील. यास वामनौली म्हणतात . या स्थितीत थोडा वेळ थांबून उलटक्रमाने पूर्वस्थितीत या.
3) पूर्वस्थितीत येताना प्रथम दोन्ही मांडीवर हाताचा भार देऊन मध्यनौली करा. मग हात ढिले ठेवून उडिडयान करा. शेवटी पोट ढिले सोडून उभे राहून श्वास घ्या.
4) अशा रीतीने श्वासोच्छ्वास स्वाभाविक झाल्यावर वामनौलीची तीन ते चार वेळा पुनरावृत्ती करा.
दक्षिणनौली क्रिया मराठी माहिती
दक्षिणनौली क्रिया कृती
1) उभे राहून मध्यनौली करा.
2) मध्यनौली केल्यानंतर डाव्या मांडीवरील हाताचा भार कमी करून फक्त उजव्या मांडीवर भार द्या. म्हणजे नळ आपोआप उजव्या बाजूस येऊन स्थिर राहतील. यास दक्षिणनौली म्हणतात. या स्थितीत थोडा वेळ थांबून उलटक्रमाने पूर्वस्थितीत या.
3) पूर्वस्थितीत येताना प्रथम दोन्ही हातांचा मांडीवर भार देऊन मध्यनौली करा. मग हाताचा भार कमी करून उडिडयान करा. शेवटी पोट ढिले सोडून उभे राहून श्वास घ्या.
4) अशा रीतीने श्वासोच्छ्वास स्वाभाविक झाल्यावर दक्षिणनौलीची तीन ते चार वेळा पुनरावृत्ती करा.
नौली क्रिया विडिओ
अजून वाचा:
- शवासन मराठी माहिती
- शीर्षासन मराठी माहिती
- पवनमुक्तासन मराठी माहिती
- सर्वांगासन मराठी माहिती
- भुजंगासन मराठी माहिती
- शलभासन मराठी माहिती
- मयूरासन मराठी माहिती
- धनुरासन माहिती मराठी
- अर्धमच्छेंद्रासन मराठी माहिती
- मत्स्यासन मराठी माहिती
- योग मुद्रा (योगमुद्रासन) मराठी माहिती
- पद्मासन माहिती मराठी
- ध्यान कसे करावे
- योगासन करताना कोणती काळजी घ्यावी
- योगाचे फायदे