पाणी मराठी निबंध मराठी – Water Essay in Marathi

पाणी म्हणजेच जीवन! ‘जीवन’ या नावातच पाण्याचे महत्त्व दडलेले आहे. पाणी ही आपल्याला निसर्गाकडून मिळालेली भेट आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि मग आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होतो. पाणी फार मौल्यवान आहे, ते जपून वापरले पाहिजे.

पाणी नसले तर काय होईल, याची कल्पना दुष्काळातच येते. तहान लागली असताना पाणी मिळाले नाही की, डोळ्यांत पाणी उभे राहते! खेडोपाडी पाण्यासाठी लोकांना डोक्यावर हंडे, कळश्या घेऊन अनेक मैल हिंडावे लागते. पाण्याविना शेती फुलत नाही.

आता जगात सगळीकडेच पाण्याचा प्रश्न उभा आहे. कारण पृथ्वीवरील माणसांना आवश्यक आहे, एवढा पाण्याचा साठा उरला नाही. पृथ्वीच्या पोटातील पाण्याची पातळी खालावत आहे. आकाशातून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न हा पाणीसंचयाचाच भाग आहे. पाणी आपण वाचवले पाहिजे. ते जमिनीत मुरवले पाहिजे. तरच यापुढे माणसाचा टिकाव लागणार आहे.

पाणी मराठी निबंध – Water Essay in Marathi

आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्याचा आहे. पाणी नसेल तर आपण फार काळ जगू शकणारच नाही. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते. मुळात ह्या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली त्या मागचे मुख्य कारण म्हणजे इथे पाणी होते हेच आहे. म्हणूनच संस्कृतमध्ये पाणी ह्या शब्दाला समानार्थी शब्द ‘जीवन’ हाच आहे.

आपल्या पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्यानेच व्यापलेला आहे. शनी, गुरू, मंगळ ह्या ग्रहांवर जीवसृष्टीचा अभाव आहे कारण तिथे पाणीच नाही. चंद्राचेही तेच आहे. जिथे पाणी असते तिथेच जीवसृष्टीला निर्माण होण्यासाठी आवश्यक असे तापमान, प्राणवायू, अन्न इत्यादी घटक असतात.

म्हणूनच पाणी हे सर्व सजीवांचे अमृत आहे. ते ह्या पृथ्वीवर अनेक रूपांमध्ये मिळते. वायूरूपात, द्रवरूपात, हिमरूपात आपल्याला ते दिसते. विहिरी, तळी, सरोवर, झरे, ओढे, नाले, नद्या, समुद्र आणि महासागर अशी त्यांची अनेक रूपे आहेत. हिमालयात ते हिमनदी आणि हिमनगाच्या रूपात आढळते. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील सागरात तर असे कित्येक हिमनग तरंगत असतात.

समुद्र आणि महासागर हे पाण्याचे अतिविशाल साठे असूनही ते खारट असल्याने आपण त्यांच्या पाण्याचा थेट वापर करू शकत नाही. सूर्याच्या उष्णतेने त्या पाण्याची वाफ होऊन ते हवेत वर जाते तेव्हा त्यातील क्षार खालीच राहातात. वर तापमान थंड असल्याने वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पावसाच्या रूपाने खाली येते. हे असे जलचक्र वर्षानुवर्षे चालूच असते.

स्वच्छता राखण्यासाठी, आंघोळीसाठी, शेतीसाठी, कारखाने चालवण्यासाठी आणि जलविद्युत निर्माण करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. त्याशिवाय वाहतुकीसाठीही नद्यांचा आणि समुद्राचा वापर करतो. आपल्या देशातील हजारो गावात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि वेगाने होणारे औद्योगीकरण ह्यामुळे पाण्याची गरज वाढते आहे पण दुसरीकडे ते जपून वापरण्याची वृत्ती मात्र नाहीशी होत चालली आहे. पाण्याचे प्रदूषणही वाढत चालले आहे. गंगायमुनेसारख्या पुरातन आणि प्राचीन नद्याही आज प्रदूषित झाल्या आहेत.

केंद्रातील आणि राज्यांतील सरकारांनी मिळून कित्येक पाणीयोजना तयार केल्या ख-या परंतु त्यांची अंमलबजावणी चांगली झाली नाही. राजस्थान, गुजरात, ओरिसा भागात गरजेपेक्षा पाऊस खूप कमी पडतो किंवा कधीकधी पडतच नाही. त्यामुळे दुष्काळ पडतो, शेती पिकत नाही, जनावरे मरतात, माणसे पाण्यासाठी तडफडतात.शेवटी लोकांना पाण्यासाठी गाव सोडून देशोधडीला लागावे लागते.

म्हणूनच पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे. त्यासाठी प्राचीन काळातील उपाय अवलंबावे लागणार आहेत. लहान बांधबंधारे, तलाव, विहिरी ह्यांची निर्मिती केली पाहिजे. म्हणजे मग पाणी जमिनीत मुरेल आणि जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढेल. माणसाने खरोखर निसर्गाचा आदर राखून वागले पाहिजे हेच खरे आहे.

पाणी हेच जीवन मराठी निबंध – Pani Hech Jivan Easy Essay in Marathi

आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्यांचा आहे. पाणी नसेल तर आपण फार काळ जगू शकणारच नाही. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची गरज असते. मुळात ह्या पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली त्या मागचे मुख्य कारण म्हणजे इथे पाणी होते हेच आहे. म्हणूनच संस्कृतमध्ये पाणी ह्या शब्दाला समानार्थी शब्द ‘जीवन’ हाच आहे

आपल्या पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्यानेच व्यापलेला आहे. शनी, गुरू, मंगळ ह्या ग्रहांवर जीवसृष्टीचा अभाव आहे कारण तिथे पाणीच नाही. चंद्राचेही तेच आहे. जिथे पाणी असते तिथेच जीवसृष्टीला निर्माण होण्यासाठी आणि तगून राहाण्यासाठी आवश्यक असे तापमान, प्राणवायू, अन्न इत्यादी घटक असतात.

म्हणूनच पाणी हे सर्व सजीवांचे अमृत आहे. ते ह्या पृथ्वीवर अनेक रूपांमध्ये उपलब्ध आहे. वायूरूपात, द्रवरूपात, हिमरूपात आपल्याला ते दिसते. विहिरी, तळी, सरोवर, झरे, ओढे, नाले, नद्या, समुद्र आणि महासागर अशी त्यांची अनेक रूपे आहेत. हिमालयात ते हिमनदी आणि हिमनगाच्या रूपात आढळते. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील सागरात तर असे कित्येक हिमनग तरंगत असतात.

समुद्र आणि महासागर हे पाण्याचे अतिविशाल स्त्रोत असूनही ते फार खारट असल्याने आपण त्यांच्या पाण्याचा थेट वापर करू शकत नाही. सूर्याच्या उष्णतेने त्या पाण्याची वाफ होऊन ते हवेत वर जाते तेव्हा त्यातील क्षार खालीच राहातात. वर तापमान थंड असल्याने वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते आणि ते पावसाच्या रूपाने खाली येते. हे असे जलचक्र वर्षानुवर्षे चालूच असते.

स्वच्छता राखण्यासाठी, आंघोळीसाठी, सिंचनासाठी, कारखाने चालवण्यासाठी आणि जलविद्युत निर्माण करण्यासाठी आपण पाण्याचा वापर करतो. त्याशिवाय जलवाहतुकीसाठीही नद्यांचा आणि समुद्राचा वापर करतो. आपल्या देशातील हजारो गावात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि वेगाने होणारे औद्योगीकरण ह्यामुळे पाण्याची गरज वाढते आहे पण दुसरीकडे ते जपून वापरण्याची वृत्ती मात्र गहाळ होत चालली आहे. जे पाणी मिळते ते प्रदूषित झालेले असते. आज सांगली, इचलकरंजीसारख्या भागात साखरकारखान्यांची मळी थेट पंचगंगा नदीत सोडली गेल्यामुळे लोकांना पोटाचे विकार उद्भवत आहेत. गंगायमुनेसारख्या पुरातन आणि प्राचीन नद्याही आज प्रदूषित झाल्या आहेत.

केंद्रातील आणि राज्यांतील सरकारांनी मिळून कित्येक पाणीयोजना तयार केल्या ख-या परंतु त्यांची अंमलबजावणी चांगली झाली नाही. त्यामुळे करोडो रूपये पाणीपुरवठ्याच्या योजनांवर खर्च करूनही इच्छित परिणाम साधता आलेला नाही तो नाहीच. राजस्थान, गुजरात, ओरिसा ह्या भागात गरजेपेक्षा पाऊस खूप कमी पडतो किंवा कधीकधी तो पडतच नाही. मराठवाड्यातही तीच परिस्थिती असते. त्यामुळे दुष्काळ पडतो, शेती पिकत नाही, जनावरे मरतात, माणसे पाण्यासाठी तडफडतात. शेवटी लोकांना पाण्यासाठी गाव सोडून देशोधडीला लागावे लागते.

म्हणूनच पावसाचे पाणी साठवून ठेवले पाहिजे. त्यासाठी प्राचीन काळातील उपाय अवलंबावे लागणार आहेत. लहान बांधबंधारे, तलाव, विहिरी, बारव ह्यांची निर्मिती केली पाहिजे. म्हणजे मग पाणी जमिनीत मुरेल आणि जमिनीतल्या पाण्याची पातळीवाढेल.

माणसाने खरोखर निसर्गाचा आदर राखून वागले पाहिजे हेच खरे आहे

पाणी मराठी निबंध – Water Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply