वायु प्रदूषण निबंध मराठी – Essay On Air Pollution in Marathi

वायू हा पंचमहाभूतांतील एक महाभूत आहे. वायू हा जीवनासाठी अत्यंत आवश्यक असतो. प्राणवायू कमी मिळाला; तर सजीवांना जगणे अशक्य असते. अन्न व पाणी यांच्याविना काही काळ काढता येतो. पण हवेविना जगताच येत नाही.

हवा ही आपल्याला मोफत मिळत असल्यामुळे आपल्याला तिची किंमत वाटत नाही. त्यामुळे आपल्याकडून ती अनेकदा दूषित केली जाते. शहरांत असे काही कारखाने असतात की, त्यांतून सोडलेल्या वायूमुळे हवा प्रदूषित होते.

अनेक ठिकाणी शौचालये नसल्यामुळे लोक वाटेल तेथे घाण करतात. त्यामुळे हवा प्रदूषित होते. त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच सहन करावे लागतात.

वायुप्रदूषणाने अनेक रोग पसरतात. वेगवेगळ्या साथींचा प्रसार होतो. काही लोकांना त्वचारोग होतात. साफसफाईची कामे करणाऱ्यांना पुष्कळदा वायुप्रदूषणामुळे मृत्यूही येतो. खाणीत काम करणाऱ्यांना हा धोका संभवतो. तेव्हा वायुप्रदूषण होऊ नये याची माणसानेच काळजी घ्यायला हवी.

वायु प्रदूषण निबंध मराठी – Essay On Air Pollution in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply