समता हवी निबंध मराठी

आपल्या देशात अनेक बाबतीत खूप विविधता आहे. येथे अनेक भाषा आहेत, अनेक जातींचे व धर्मांचे लोक राहतात. येथे अनेक प्रांतही आहेत. येथील लोकांच्या पोशाखात विविधता आहे. खाण्यापिण्यात विविधता आहे. त्यामुळे एका प्रांतातील माणसाला दुसऱ्या प्रांतातील माणूस वेगळा दिसतो. प्रत्येकजण स्वत:ला चांगला, श्रेष्ठ समजतो.

दुसऱ्याला वाईट वा कमी दर्जाचा समजतो. यातून विषमता निर्माण होते. यामुळे देशातील लोकांमध्ये आपापसांत भांडणे होतात. आपल्या देशाला हे घातक आहे. देशात अशी विषमता जोवर आहे, तोवर देशाची खरी उन्नती, प्रगती केव्हाही होणार नाही.

आपण सर्वांनी समतेची दृष्टी बाळगली पाहिजे. जातीवरून कोणी श्रेष्ठ-कनिष्ठ ठरत नाही. तसेच, एखादयाकडे खूप संपत्ती आहे, म्हणून तो चांगला माणूस असेल, असे नाही. तसेच, स्वत:ची भाषा बोलणारे सर्व सज्जन असतात आणि इतर भाषा बोलणारे वाईट असतात, असेही नाही.

आपला देश आपल्याला समर्थ करायचा आहे. त्यासाठी आपण विषमता नष्ट केली पाहिजे. जातीवरून, धर्मावरून, भाषेवरून किंवा संपत्तीवरून कोणालाही चांगला वा वाईट ठरवता कामा नये. सर्व भारतीय सारखेच आहेत, असे आपण मानले पाहिजे.

पुढे वाचा:

Leave a Reply