सत्संगती मराठी निबंध – Satsangati Nibandh Marathi

सत्संगती म्हणजे चांगल्या लोकांत मिळून मिसळून राहणे. श्रेष्ठ लोकांच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगले गुण येतात व ते विकसित होतात. आपल्यापेक्षा अधिक योग्य, गुणी, बुद्धिमान विद्वानांच्या सहवासाला सत्संगती म्हणतात. याउलट अयोग्य गुणहीन, मूर्ख व्यक्तीचा सहवास म्हणजेच कुसंगती होय. सभोवतालच्या वातावरणातून मनुष्य बरेच काही शिकतो जर त्याला चांगली संगत मिळाली तर त्याचा निरंतर विकास होत राहतो. विनोबा भावे म्हणतात,

“सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो।

कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो॥

सत्संगतीमुळे माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याची उत्तरोत्तर प्रगती होते. अशा प्रकारे साधूसज्जनांच्या संपर्कात आल्यामुळे दुष्टांमध्येही चांगले गुण येतात. परंतु दुष्टांच्या दुष्टपणाचा सज्जन माणसावर काही परिणाम होत नाही. सत्संगती माणसासाठी सर्व काही करते. नारदमुनींच्या सहवासात आल्यामुळे वाल्याचा महर्षि वाल्मीकी बनला. अशा प्रकारे सत्संगतीमुळे मानवाची जीवनशैलीचं बदलून जाते. संगतीचा परिणाम प्रत्येक माणसावर होतोच. जशा संगतीत तो राहतो तसेच त्याचे आचरण बनते. कुसंगती मुळे वाईट मागीला लागलेले अनेक लोक आपल्या आजूबाजूला दिसतात.

सत्संगती माणसाला विकासोन्मुख करते तर कुसंगती माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. विद्यार्थी जीवनात सत्संगतीला विशेष महत्त्व आहे. कुसंगतीत पडल्यास विद्यार्थ्याचे आयुष्य वाया जाईल. सत्संगतीत राहील तर कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे मोती बनून सदैव चमकत राहील. सज्जन मनुष्याचे अनुकरण सर्वच करतात. त्याच्याकडे समाजात आदराने पाहिले जाते. सत्संगती माणसाला जीवनातील अडचणींचा सामना करण्याची शक्ति देते. व्यसने लागू शकत नाहीत. थोडक्यात, आपण नेहमी चांगल्या मित्रांच्या, व्यक्तिंच्या सहवासात असावे व वाईट व्यक्तिंना टाळावे.

पुढे वाचा:

Leave a Reply