Set 1: माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Mor Nibandh Marathi

मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. हा पक्षी फार सुंदर आणि डौलदार असतो. त्याच्या डोक्यावर छानदार तुरा असतो. पण त्याचे पाय कुरूरुप व उंच असतात. मोराचा पिसारा वजनदार व लांबलचक असतो. या पिसाऱ्यातील प्रत्येक पिसावर निळे, हिरवे, जांभळे, सोनेरी असे विविध , रंग असतात. त्यामुळे प्रत्येक पिसावर डोळ्याची आकृती तयार झालेली असते. त्याची मान निळी व उंच असते.

मोर रानात राहतो. तो धान्यकण व कीटक खातो. तो फार उंच उडू शकत नाही. पावसाळी ढगांना पाहून मोर आपला पिसारा पसरतो आणि आनंदाने नाचू लागतो. नाचणारा मोर अतिशय विलोभनीय दिसतो. मुलांना मोराचे पंख खूप आवडतात. ते त्यांना पुस्तकात जपून ठेवतात.

Set 2: माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Mor Nibandh Marathi

निसर्गामध्ये विविध रंगांचे विविध आकारांचे खूप सुंदर-सुंदर मनोवेधक आणि डौलदार पक्षी असतात. आवाज, रंग आणि सौंदर्य याबाबतीत प्रत्येक पक्षी निराळा असतो, त्याचे वैशिष्ट्य निराळे असते. मोर हा असाच एक सुंदर व विलोभनीय पक्षी आहे.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. त्यांची डौलदार चाल, थुईथुई नाच पाहून सर्वच लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. निळसर व उंच लकाकणारी मान आणि डोक्यावरील आकर्षक तुरा यामुळे त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. मोराला हिरव्या, जांभळ्या, निळ्या रंगाचा मनमोहक पिसारा लाभला आहे. त्या पिसाऱ्यावरचा सुरेख डोळा मोराचे सौंदर्य वाढवतो.

आकाशात कृष्णमेघांची दाटी झाली की, मोर आपला पिसारा फुलवून थुईथुई नाचायला लागतो. त्याचे थुईथुई नृत्य पाहून अनेक कविमनातून काव्य फुलते.

‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच’ हे आमचे मोराबद्दलचे आवडते गाणे आम्ही तालासुरात, नाचत गातो. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. विद्यादेवी सरस्वतीचे तो वाहन आहे. त्याच्या आरवण्याला ‘केकारव’ म्हणतात. राधानगरीच्या दाजीपूर अभयारण्यात पुष्कळ मोर आपल्याला पाहायला मिळतात. किडे, मुंग्या, साप खाऊन मोर आपली गुजराण करतो. कधी-कधी दुधावर आलेली ज्वारीची कणसे भाताची लोंबे खातो.

Set 3: आपला राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी – Apla Rashtriya Pakshi Mor Nibandh Marathi

कमळ निसर्गात अनेक पक्षी आहेत. पण जसा वाघ हा राष्ट्रीय प्राणी, हे राष्ट्रीय फूल तसेच मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पक्षी त्याच्या सुंदर पिसाऱ्यामुळे आवडतो. लहान मुले स्नाच रे मोरा, आंब्याच्या वनातअशा बालगीतातून त्याच्याशी दोस्ती करतात. त्याच्या डोक्यावरील तुऱ्याने त्याची चाल ऐटदार, डौलदार वाटते तर त्याच्या उंच अशा निळ्या मानेमुळे व पिसाऱ्यामुळे तो भारदस्त वाटतो.

पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली की हा थुई थुई नाचायला लागतो. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. तो रानात राहतो. तो शाकाहारी व मांसाहारी असा मिश्रहारी पक्षी आहे. मोरा हा सरस्वतीचे वाहन म्हणून प्रसिद्ध आहे.

Set 4: आपला राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी – Apla Rashtriya Pakshi Mor Nibandh Marathi

मोर आमच्या वनातील एक अत्यंत सुंदर, सावध, लाजाळू पण चतुर पक्षी आहे. भारत सरकारने १९६३ मध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यास राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. सौंदर्याचे हे मूर्त रूप साऱ्या भारतीयांना फार आवडते. कवी कालिदासाने त्या काळात मोराला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा दिला होता.

मोर जेव्हा बेधुंद होऊन नाचतो तेव्हा आपली शेपटी उंचावून पंख्यासारखी पसरवितो. हे दृश्य पाहून भान हरपते. मोराचे शरीर अनेक रंगांचे असते. त्या रंगांच्या छायांचे एक अद्भुत मिश्रण असते. गळ्याचा आणि छातीचा रंग निळा असतो. गळ्याच्या निळेपणावरून संस्कृत कवी त्याला ‘नीलकंठ’ म्हणतात.

मोर सामान्यपणे पावसाळ्यात नृत्य करतो. खूप लांबून येणाऱ्यांचा आवाज तो ऐकू शकतो. उन्हाळ्यात मोर सुस्तावतात. मोर सापांना मारून खातो. मोर माणसाला त्रास देत नाही. हा सावध आणि भित्रा पक्षी आहे. सामान्यतः कळप करून रहातो. धान्य, किडे व काही भाज्या हे त्याचे अन्न होय. तो काही ऊंचीपर्यंत व अंतरापर्यंतच उडू शकतो. शत्रुपासून बचाव करण्यासाठी त्याला लांब, बारीक परंतु बळकट पाय मिळालेले आहेत. मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. असा हा आपला राष्ट्रीय पक्षी आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतो.

अनेक मंदिरात देवाला मोरपिसे वाहतात. सजावटीसाठी मोरपिसांना मागणी असते. फुलदाणीत ही मोरपिसे लावतात. त्याचे पंखेही बनवितात. त्याने वारा घेता येतो.

Set 5: माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Mor Nibandh Marathi

मोर एक अंत्यत आकर्षक व रंगी-बेरंगी प्राणि आहे. त्याच्या पंखात इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतात. त्याचा आवाज देखील खूप मधूर असतो. त्याच्या नृत्याबद्दल तर काय बोलावं! त्याला मोठे कारण आहे, मादी अंडे देते, आपल्या पिल्याचे पालन-पोषण करते. ती सुंदर नसण्याचे आणखी एक कारण असावे की तिच्याकडे खास करून हिंसक प्राण्याचे लक्ष जावू नये.

मोराला आपण राष्ट्रीय पक्षी मानलेले आहे. आपली विविधतेत एकता तसेच रंगी-बेरंगी विविध संस्कृतीचे ते योग्य प्रतिक आहे. त्याची लांब आणि राजेशाही थाटाची मान गडद निळ्या रंगाची असते. म्हणून त्याला निलकंठ असे देखील म्हणतात. त्याच्या डोक्यावर मुकूटासारखी नक्षी असते. असू का नाही, शेवटी तो पक्षाचा राजाच आहे.

मोराला अतिशय पवित्र समजले जाते. त्यांच्या पंखाचा मंदिरात उपयोग केला जातो. सामान्य जीवनात देखील मोरांचे पंख अतिशय लोकप्रिय असतात. बाल श्रीकृष्णाला नेहमी मोरपंख धारण केलेलं दाखवलेलं असतं. मोर देवी-देवतांचे देखील वहान आहे. उद्याने, पार्कस् आणि जंगलात पहायला मिळतात. मोठे असल्याने ते उंच उडी नाही मारू शकत. थोड्या-थोड्या उड्या मारतात, संधी मिळाल्यास दूर-दूर पळतात.

मोरांचे नृत्य पहाण्याजोगे असते. एका नृत्याला तर मोरनृत्य असे नाव देखील मिळाले आहे. मोर-नृत्यात मोराच्या पंखाचे सारखे पंख लावून नृत्य केले जाते.

Set 6: आपला राष्ट्रीय पक्षी मोर निबंध मराठी – Apla Rashtriya Pakshi Mor Nibandh Marathi

कमळ निसर्गात अनेक पक्षी आहेत. पण जसा वाघ हा राष्ट्रीय प्राणी, हे राष्ट्रीय फूल तसेच मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पक्षी त्याच्या सुंदर पिसाऱ्यामुळे आवडतो. लहान मुले स्नाच रे मोरा, आंब्याच्या वनातअशा बालगीतातून त्याच्याशी दोस्ती करतात. त्याच्या डोक्यावरील तुऱ्याने त्याची चाल ऐटदार, डौलदार वाटते तर त्याच्या उंच अशा निळ्या मानेमुळे व पिसाऱ्यामुळे तो भारदस्त वाटतो.

पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली की हा थुई थुई नाचायला लागतो. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. तो रानात राहतो. तो शाकाहारी व मांसाहारी असा मिश्रहारी पक्षी आहे. मोरा हा सरस्वतीचे वाहन म्हणून प्रसिद्ध आहे.

माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Mor Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply