शिक्षक दिन माहिती मराठी – Teacher Day Information in Marathi
५ सप्टेंबर हा दिवस शाळा-कॉलेजांमधून ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे आपले माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.
डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म आंध्र प्रदेशात ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात तत्त्वज्ञान हा विषय शिकवण्यास सुरुवात केली. पुढे ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरूही झाले.
डॉ. राधाकृष्णन यांनी अनेक ग्रंथ लिहून आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि तत्त्वज्ञानाचा पाश्चिमात्य देशांना परिचय करून दिला. १९३१ ते १९३९ या काळात ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ या काळात ते भारताचे रशियातील राजदूत होते. १९५२ ते १९६५ या काळात ते प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती झाले. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले.
शिक्षण या विषयात त्यांना विशेष रुची होती. ते १९४८ मध्ये भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचेही अध्यक्ष होते. १६ एप्रिल १९७५ रोजी त्यांचे निधन झाले. या श्रेष्ठ शिक्षणतज्ज्ञाचा आदर करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आदरपूर्वक फुले देऊन अभिवादन करतात. या दिवशी शिकवण्याचे काम विद्यार्थी आपल्या अंगावर घेतात व शिक्षकांना एक दिवस विश्रांती देतात. विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता दर्शवणारी भाषणे करतात व करमणुकीचे कार्यक्रम सादर करतात. विद्यार्थ्याच्या दृष्टीने गुरुपौर्णिमेप्रमाणे शिक्षकदिनाचेही महत्त्व आहे.
पुढे वाचा:
- स्वातंत्र्य दिन माहिती मराठी
- लोकमान्य टिळक पुण्यतिथी
- 1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी
- डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहिती
- गुड फ्रायडे मराठी माहिती
- ख्रिसमस नाताळ माहिती मराठी
- रमजान ईद माहिती मराठी
- बकरी ईद माहिती मराठी
- मोहरमची संपूर्ण माहिती
- पतेती सण माहिती मराठी
- गुरू नानक जयंती विषयी माहिती
- बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी
- भगवान महावीर जयंती माहिती
- दत्तजयंती माहिती मराठी
- धनत्रयोदशी माहिती मराठी
- नवरात्र – दसरा माहिती मराठी
- गणेश चतुर्थी माहिती मराठी
- बैल पोळा सणाची माहिती
- नारळी पौर्णिमा माहिती मराठी
- नागपंचमी माहिती मराठी
- गुरुपौर्णिमा विषयी माहिती मराठी
- आषाढी एकादशी माहिती
- वटपौर्णिमा संपूर्ण माहिती
- हनुमान जयंती माहिती
- गुढीपाडवा माहिती
- होळी सणाची माहिती
- दिवाळी सणाची माहिती
- रामनवमी माहिती मराठी