अंगण हरवलेली घरे निबंध मराठी – Aangan Haravleli Ghar Nibandh Marathi
काही वर्षांपूर्वी माणसे आपापल्या स्वतंत्र घरात राहत. प्रत्येक घराला पुढेमागे अंगण असे. त्यामुळे घरातील मुलांना मोकळेपणाने खेळता येत असे. घरात काही कार्य असेल, तर अंगणात मांडव घालता येत असे. मागच्या अंगणात घरगुती कामे चालत. वाळवण घालता येत असे. घरातील स्त्रियांची गप्पांची मैफल रंगत असे. शहरात चाळी उभ्या राहिल्या तरी दोन चाळींमधल्या मोकळ्या जागेत मुलांना खेळता येत असे.
आता शहरा-गावांतून गर्दी झाली आहे. जागा मिळेल तेथे बांधकामे केली जातात. त्यामुळे अंगणे हरवून गेली आहेत. मोकळ्या जागा असतात तेथे झोपडपट्टी उभी राहते. क्रीडांगणांवर सभांसाठी व्यासपीठ उभे राहिलेले असते. स्वाभाविकच मुलांना खेळायला मोकळे अंगणही नसते. काही शाळांत शारीरिक शिक्षणाचा तासही चार भिंतींच्या आत वर्गात होतो.
याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. विद्यार्थी खेळण्याऐवजी मुले दूरचित्रवाणी संचासमोर बसतात. त्यांचे बालपण हरवू लागले आहे. जीवनातील आनंदाला ही मुले आणि मोठी माणसेही पारखी होत आहेत. अंगण हरवल्यामुळे माणसातील माणूसपणही हरवत आहे.
पुढे वाचा:
- दूरदर्शन नसते तर निबंध मराठी
- लाल बहादूर शास्त्री निबंध
- स्वामी विवेकानंद निबंध मराठी
- मकरसंक्रांत निबंध मराठी
- प्रजासत्ताक दिन निबंध मराठी
- नवीन वर्ष निबंध मराठी
- पावसाळा निबंध मराठी
- मानव आणि पर्यावरण
- पर्यावरण निबंध मराठी
- माझा आवडता प्राणी सिंह
- माझा आवडता प्राणी गाय
- माझा आवडता प्राणी कुत्रा
- माझा आवडता प्राणी निबंध
- माझा आवडता प्राणी हत्ती निबंध
- माझा आवडता पक्षी पोपट
- पोपट पक्षी माहिती मराठी
- शिवाजी महाराज निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझी मायबोली मराठी निबंध
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध