वेरूळ अजिंठा लेणी निबंध मराठी – Ajintha Verul Leni Nibandh Marathi
महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे अत्यंत सुंदर लेणी आहेत. युनेस्कोने ह्या लेण्यांना जागतिक वारसा असल्याचा दर्जा दिला आहे त्यावरून त्यांचे महत्व समजून येते.
वेरूळ येथे शिल्पकलेचे एक जितेजागते उदाहरण कैलास लेण्याच्या स्वरूपात उभे आहे. औरंगाबाद शहरापासून २९ किलोमीटर अंतरावर असलेली ही लेणी राष्ट्रकुट आणि यादव घराण्यांच्या राजांनी बांधली होती. एकुण ३४ गुंफा येथे आहेत. त्यातील हिंदू आणि बौद्ध गुंफा राष्ट्रकुटांच्या काळात बांधल्या गेल्या तर जैन गुंफा यादव काळात बांधल्या गेल्या. हिंदू गुंफामधील कैलासनाथाचे मंदिर वरपासून खालपर्यंत खोदत तयार केले गेले आहे. त्यात असे एक शिल्प आहे की रावण कैलास पर्वत हलवतो आहे. त्या पर्वतावर शंकरपार्वती बसलेले आहेत आणि पार्वती भयभीत होऊन खाली पाहाते आहे. तिच्या चेह-यावरील भाव त्या शिल्पात एवढे उत्कृष्ट वठवले आहेत की पाहून अगदी दंग व्हायला होते. त्याशिवाय तिथे १५ व्या गुंफेत दशावतारांच्या मूर्ती आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातच अंजठाचीही लेणी आहेत. मात्र औरंगाबादपासून ही लेणी १०४ किलोमीटर दूर आहेत तर जळगावपासून ५९ किलोमीटर दूर आहेत. वेरूळपेक्षा ही लेणी अधिक पुरातन आहेत. जवळजवळ ख्रिस्तपूर्व २०० वर्षांपूर्वी येथील पहिल्या गटातील गुंफा बांधल्या गेल्या तर इस ४०० ते ६५० ह्या काळात दुस-या गटातील गुंफांचे बांधकाम झाले. १९८३ सालापासून ह्या गुंफांनाही जागतिक वारशाचा दर्जा मिळाला आहे.
इंग्रजांच्या काळात ह्या भागात घनदाट जंगल होते. त्यामुळे ह्या गुंफा तिथे जंगलात आहेत ह्याचा कुणालाही पत्ताच नव्हता. परंतु १८९१ साली त्या जंगलात शिकारीला आलेल्या एका ब्रिटिश अधिका-याला ह्या गुंफा योगायोगाने सापडल्या. येथे भित्तीचित्रे आहेत. त्यातील रंग अगदी ताजेतवाने दिसतात. तिथे निद्रिस्त बुद्धाची मूर्तीसुद्धा आहे. येथील सर्व मूर्ती पाहून चित्त नुसते दंग होऊन जाते.
परंतु वारा, पाऊस आणि उन्हे ह्यामुळे येथील चित्रांची दशा आता दिवसेंदिवस खराब होऊ लागली आहे. ह्या वारशाचे जतन करण्यासाठी मनापासून प्रयत्न व्हायला हवे आहेत.
पुढे वाचा:
- वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध
- वृक्षारोपण काळाची गरज निबंध मराठी
- वृक्षांचे सौंदर्य निबंध मराठी
- वृक्षांचे महत्व मराठी निबंध
- वृक्षसंपत्ती मराठी निबंध
- वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध
- वृक्ष आपले मित्र मराठी निबंध
- जर वीज नसती तर मराठी निबंध
- विहिरीचे मनोगत निबंध मराठी
- विवाहाचे दृश्य निबंध मराठी
- विद्यार्थ्यांनी राजकारण करावे काय?
- विद्यार्थी वर्ग कालचा, आजचा
- विज्ञान एक वरदान निबंध मराठी