वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध – Rutta Patrache Mahatva in Marathi

मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात रोज नवनवीन घटना घडतात त्या मानवी जीवनाला प्रभावित करतात. छोट्या छोट्या घटना जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. जसजसा आपला बौद्धिक स्तर उंचावत जातो तसतसे आपण जगभरातील घटनांची माहिती मिळवू इच्छितो. या आपल्या जिज्ञासेची तृप्ती वृत्तपत्र करते. भारतात वृत्तपत्राच्या विकासाचा श्रीगणेशा १७८० मधील बंगाल गॅझेट’ पासून मानला जातो. त्यानंतर हिंदीतील पहिले वृत्तपत्र, उदंड मार्तण्ड’ संपादक श्री जुगलकिशोर यांनी काढले. भारतात वृत्तपत्राचा विकास स्वतंत्रता चळवळीपासून सुरू झाला. अनेक राष्ट्रीय पुढाऱ्यांनी वृत्तपत्र काढले. त्यामुळे त्यांचा जनतेशी संपर्क प्रस्थापित झाला. राजा राम मोहन रॉय यांनी पहिले उर्दू वृत्तपत्र ‘मिराईतुलम’ काढले. टिळकांचेकेसरी‘ व ‘मराठा’, महात्मा गांधीचे ‘हरिजन’ आणि ‘यंग इंडिया’ ही हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी वृत्तपत्रे प्रकाशित झाली. हळूहळू यांचा प्रसार-प्रचार वाढला. आज आपल्या देशात असंख्य वृत्तपत्रे दररोज प्रकाशित होतात.

वृत्तपत्रे फक्त दैनिकच असतात असे नव्हे. तर पाक्षिक,मासिक, साप्ताहिक, वार्षिक, अर्धवार्षिक पण असतात. प्रमुख वृत्तपत्रे प्रात:कालीन असतात तर काही सायंकालीन पण असतात. सर्वात जास्त प्रात:कालीन दैनिकेच लोकप्रिय आहेत. कारण त्यातून देश-विदेशांतील मुख्य माहिती मिळते.

हे जाहिरातयुग आहे. मोठमोठ्या कंपन्या वृत्तपत्रांतून आपल्या मालाची जाहिरात करतात. त्या लोक वाचतात त्यामुळे लोकांना अनेक वस्तूंची माहिती होते. व्यापार वाढतो तसेच वृत्तपत्रांचाही आर्थिक लाभ होतो. वृत्तपत्रांमुळे आपल्याला जगाची माहिती घरबसल्या मिळते. नौकरी विषयक बातम्या, विवाह मंडळांची माहिती, घरांची माहिती, बाजारभाव, स्थानिक घडामोडी, शैक्षणिक संस्था, वेगवेगळे अभ्यासक्रम या सर्वांबद्दल माहिती मिळते. लोक वेगवेगळया कारणांनी वृत्तपत्रे वाचतात. कोणाला सिने जगतातील माहिती हवी असते तर कोणाला खेळांविषयी.

लोकशाही असणाऱ्या देशात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे. समाजातील वाईट चालीरीती दूर करण्यात वृत्तपत्रे मागे नाहीत. प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट, दिवाळी, होळी, इत्यादी वर वृत्तपत्रे विशेषांक प्रकाशित करतात. यातील लेख माहितीपूर्ण असतात. वृत्तपत्रे केवळ नवीन माहितीच आपणास पुरवितात असे नसून विचारांची देवाण-घेवाण पण करतात. निवडणूक काळात निरनिराळ्या नेत्यांच्या घोषणा ते आपणापर्यंत पोहोचवितात.

वृत्तपत्रांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. लोकमत जाणून घेण्यासाठी तसेच जनजागरणासाठी वृत्तपत्रांचा उपयोग करता येतो. सामाजिक ऐक्य व परस्पर-सहकार्य वाढविण्यात वृत्तपत्रे मदत करु शकतात. हुंडा, अस्पृश्यता, जातीभेद दूर करण्याची कामगिरी पार पाडू शकतात. टिव्ही, काँप्यूटर्सच्या युगातही वृत्तपत्रांचे महत्त्व अबाधित आहे. वृत्तपत्रांनी ही आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन बातम्या दिल्या पाहिजेत. फक्त प्रसिद्धिच्या मागे लागू नये.

वृत्तपत्राचे महत्व मराठी निबंध – Rutta Patrache Mahatva in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply