वृक्षांचे सौंदर्य निबंध मराठी – Vruksha Che Saundarya in Marathi

वृक्ष आणि माणूस यांचे फार जवळचे नाते आहे. माणसाला घर बांधण्याची कला माहीत नव्हती, तेव्हा तो झाडाखालीच आसरा घेत असे आणि आतासुद्धा उन्हापावसात तो झाडाचाच आश्रय घेतो. हिंस्र प्राण्यांची माणसाला भीती वाटली, तर तो पटकन झाडावर चढत असे. वृक्षांच्या साली वल्कले म्हणून वापरत असे. वृक्षांवरील फळांनी तो आपली भूक शमवत असे, तर फुलांचा सुगंध त्याच्या मनाला उल्हसित करत असे. वृक्षांच्या या अतिपरिचयामुळे वृक्षांचे सौंदर्य अनेकदा आम्हा माणसांच्या कधी कधी लक्षात येत नाही.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या वृक्षांच्या गर्द रांगांतून जाताना किती प्रसन्न वाटते ! वसंतऋतूच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी झाडावर मोहोर फुलतो. या मोहराच्या मादक सुगंधाने देहभान हरवून जाते. बुटका प्रौढ संसारी माणसासारखा वाटतो, तर भरपूर पारंब्या खाली लोंबणारा वटवृक्ष ज्ञानी, अनुभवी, वृद्ध आजोबांची किंवा जटाधारी तपस्व्याची आठवण करून देतो. वर्षभर हिरव्यागार पर्णसंभाराने डवरलेला सोनचाफा चैत्रात प्रथम सुगंधाची उधळण करतो आणि पिवळ्या सोनेरी फुलांनी डोळ्यांचे पारणे फेडतो. कोकणात देवळाच्या प्रांगणात असलेला पांढरा चाफा काही काळ एखादया अनासक्त स्थितप्रज्ञासारखा निष्पर्ण होतो आणि मग बघता बघता अचानक पांढऱ्या फुलांच्या ओंजळीने देवपूजेची तयारी करतो. अंगणाच्या कोपऱ्यात कुठेतरी रातराणीचे एखादे झाड रात्री सुवासाची पखरण करत फुलते.

शहरात झाडांची गर्दी कमी असली तरी चैत्र महिन्यात लालभडक फुलांचा पोशाख परिधान करणारा गुलमोहर हिरव्या पानाचे अस्तित्वच जणू पुसून टाकतो. शहरवासीय आपल्या दिवाणखान्यात ‘बोनसाय’ ठेवून आपले वृक्षप्रेम भागवतो. वृक्षलतांशी असणारे माणसाचे असे जिव्हाळ्याचे नाते लक्षात घेऊनच तुकाराम महाराज म्हणतात

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे।’

वृक्षांचे महत्व – वृक्षवल्ली आम्हा सोयरे मराठी निबंध – Importance of Trees

पुढे वाचा:

Leave a Reply