Set 1: विद्यार्थ्यांनी राजकारण करावे काय?
आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताची आशा आहेत ह्यात काहीच शंका नाही. उद्याच्या भारताचे भावी नेते आजच्या विद्यार्थ्यांतूनच निर्माण होणार आहेत हे खरे असले तरी त्या नेतृत्वाची गुणवत्ता वाढण्यासाठी विद्यार्थी दशेत अभ्यासच करावा असे मला स्वतःला वाटते कारण विद्यार्थीजीवन हा मानवाच्या जीवनातील सुरूवातीचा काळ आहे. विद्यार्थी ह्याचाच अर्थ ज्याला विद्या घ्यायची आहे तो. ह्याच काळात माणसाच्या मनाची जडणघडण होत असते. मग अशा तुलनेने अप्रगल्भ काळात मुलांनी राजकारणात भाग घ्यावा का? असा प्रश्न पडतो.
काही लोक म्हणतात की विद्यार्थी जर राजकारणात पडले तर त्यातील ताणतणावांमुळे ते त्यांच्या अभ्यासापासून आणि शिक्षणापासून दूर जातील. तर काही लोकांचे म्हणणे असे असते की आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भावी नागरिक असतात, त्यामुळे त्यांनी राजकारणात नक्कीच भाग घ्यावा. त्यांच्यात जोश आणि उत्साह असतो, जुन्या, वाईट गोष्टी नष्ट करण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते. त्यामुळे त्यांनी राजकारणात भाग घेतला तर देश प्रगतीपथावरच जाईल.
परंतु आजचे राजकारण साधेसुधे उरलेले नाही. त्यात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेली आहे. त्याचा विद्यार्थीदशेतील मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे मुख्य कार्य आहे, शिक्षण घेणे आणि आपली गुणवत्ता वाढवणे. राजकारणात पडल्यास त्यांचे ह्या मूळ कार्यांकडे दुर्लक्ष होईल. त्यांचा पाया जर कच्चा राहिला तर वरची इमारत तरी कशी पक्की बांधली जाईल? राजकारणाच्या चक्रात अडकलेले विद्यार्थी भरकटण्याचा धोका असतो. त्यांचे धड शिक्षण पूर्ण होत नाही आणि मुरब्बी राजकारणी लोक त्यांचा तात्पुरता फायदा घेऊन मग अडगळीत टाकून देतात. १९७४-७५ साली आसामात घुसखोरांचा प्रश्न ऐरणीला आला होता तेव्हा आसू.
आसाम गणतंत्र परिषद इत्यादी राजकीय संघटनांमध्ये विद्यार्थीच उतरले होते. त्यातून उल्फा ही दहशतवादी संघटना उभी राहिली होती. त्या काळात कॉलेजे बंद पाडून विद्यार्थी लढ्यात उतरले खरे परंतु पुढे त्यांचे आंदोलन भरकटले आणि कित्येक तरूणांचे जीवनही वाया गेले.
विद्यार्थ्यांनी राजकारण करावे असे म्हणणारे लोक म्हणतात की इंदिराजींनी आणीबाणी लागू करण्यापूर्वी जयप्रकाश नारायण ह्यांनी बिहारमध्ये तरूणांची चळवळ छेडली. त्यातूनच नीतिशकुमार आणि लालूप्रसाद यादव इत्यादी विद्यार्थीनते उदयास आले. स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी नेते विद्यार्थीदशेत असतानाच राजकारणात उतरले होते. परंतु त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती. स्वातंत्र्य मिळवण्यासारखे महान उद्दीष्ट तेव्हा समोर होते.
परंतु आज तशी परिस्थिती आहे का? राजकारणात सामील होणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे का? शिवाय आजकाल बड्या बड्या नेत्यांचीच मुले वडिलांच्या गादीवर बसतात. हे जुन्या काळाच्या सरंजामशाहीचे रूपच आहे त्यामुळे मनापासून काम करणा-या कार्यकर्त्यांच्या मनात वैफल्य येऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत अभ्यास करावा, मात्र हा अभ्यास करताना डोळे उघडे ठेवून देशातील परिस्थिती काय आहे त्यावर चिंतन मनन करावे आणि विद्याभ्यास पूर्ण केल्यावर राजकारणात भाग घ्यावा. त्याचा सराव म्हणून कॉलेजातील निवडणुकांत भाग घ्यावा, वक्तृत्वकला जोपासावी, राजकारणावरची उपयुक्त पुस्तके वाचावी, समाजकार्य करायला जावे. एवढा सगळा पाया उभा करून मगच राजकारणात पडावे. असे माझे म्हणणे आहे.
Set 2: विद्यार्थ्यांनी राजकारण करावे काय?
विद्यार्थीजीवन हा मानवाच्या जीवनातील सुरूवातीचा काळ आहे. विद्यार्थी ह्याचाच अर्थ ज्याला विद्या घ्यायची आहे तो. ह्याच काळात माणसाच्या मनाची जडणघडण होत असते. मग अशा तुलनेने अप्रगल्भ काळात मुलांनी राजकारणात भाग घ्यावा का? असा प्रश्न पडतो.
काही लोक म्हणतात की विद्यार्थी जर राजकारणात पडले तर त्यातील ताणतणावांमुळे ते त्यांच्या अभ्यासापासून आणि शिक्षणापासून दूर जातील. तर काही लोकांचे म्हणणे असे असते की आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भावी नागरिक असतात, त्यामुळे त्यांनी राजकारणात नक्कीच भाग घ्यावा. त्यांच्यात जोश आणि उत्साह असतो, जुन्या, वाईट गोष्टी नष्ट करण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते. त्यामुळे त्यांनी राजकारणात भाग घेतला तर देश प्रगतीपथावरच जाईल.
परंतु आजचे राजकारण साधेसुधे उरलेले नाही. त्यात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेली आहे. त्याचा विद्यार्थीदशेतील मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे मुख्य कार्य आहे, शिक्षण घेणे आणि आपली गुणवत्ता वाढवणे. राजकारणात पडल्यास त्यांचे ह्या मूळ कार्यांकडे दुर्लक्ष होईल. त्यांचा पाया जर कच्चा राहिला तर वरची इमारत तरी कशी पक्की बांधली जाईल? राजकारणाच्या चक्रात अडकलेले विद्यार्थी भरकटण्याचा धोका असतो. त्यांचे धड शिक्षण पूर्ण होत नाही आणि मुरब्बी राजकारणी लोक त्यांचा तात्पुरता फायदा घेऊन मग अडगळीत टाकून देतात. १९७४-७५ साली आसामात घुसखोरांचा प्रश्न ऐरणीला आला होता तेव्हा आसू. आसाम
गणतंत्र परिषद इत्यादी राजकीय संघटनांमध्ये विद्यार्थीच उतरले होते. त्यातून उल्फा ही दहशतवादी संघटना उभी राहिली होती. त्या काळात कॉलेजे बंद पाडून विद्यार्थी लढ्यात उतरले खरे परंतु पुढे त्यांचे आंदोलन भरकटले आणि कित्येक तरूणांचेजीवनही वाया गेले.
विद्यार्थ्यांनी राजकारण करावे असे म्हणणारे लोक म्हणतात की इंदिराजींनी आणीबाणी लागू करण्यापूर्वी जयप्रकाश नारायण ह्यांनी बिहारमध्ये तरूणांची चळवळ छेडली. त्यातूनच नीतिशकुमार आणि लालूप्रसाद यादव इत्यादी विद्यार्थनिते उदयास आले. स्वातंत्र्यापूर्वीसुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर आदी नेते विद्यार्थीदशेत असतानाच राजकारणात उतरले होते. परंतु त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती.स्वातंत्र्य मिळवण्यासारखे महान उद्दीष्ट तेव्हा समोर होते.
परंतु आज तशी परिस्थिती आहे का? राजकारणात सामील होणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे का? शिवाय आजकाल बड्या बड्या नेत्यांचीच मुले वडिलांच्या गादीवर बसतात. हे जुन्या काळाच्या सरंजामशाहीचे रूपच आहे त्यामुळे मनापासून काम करणा-या कार्यकर्त्यांच्या मनात वैफल्य येऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत अभ्यास करावा, मात्र हा अभ्यास करताना डोळे उघडे ठेवून देशातील परिस्थिती काय आहे त्यावर चिंतन मनन करावे आणि विद्याभ्यास पूर्ण केल्यावर राजकारणात भाग घ्यावा. त्याचा सराव म्हणून कॉलेजातील निवडणुकांत भाग घ्यावा, वक्तृत्वकला जोपासावी, राजकारणावरची उपयुक्त पुस्तके वाचावी, समाजकार्य करायला जावे.एवढा सगळा पाया उभा करून मगच राजकारणात पडावे.
आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताची आशा आहेत ह्यात काहीच शंका नाही. उद्याच्या भारताचे भावी नेते आजच्या विद्यार्थ्यांतूनच निर्माण होणार आहेत हे खरे असले तरी त्या नेतृत्वाची गुणवत्ता वाढण्यासाठी विद्यार्थी दशेत अभ्यासच करावा असे मला स्वतःला वाटते.
पुढे वाचा:
- विद्यार्थी वर्ग कालचा, आजचा
- विज्ञान एक वरदान निबंध मराठी
- विज्ञान युगातील माणूस मराठी निबंध
- विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
- वायु प्रदूषण निबंध मराठी
- लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम निबंध मराठी
- बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध
- वाचाल तर वाचाल निबंध मराठी
- वाचवील पाणी, साठवील पाणी
- वाचन एक चांगला छंद मराठी निबंध
- वाघाची मावशी निबंध मराठी
- वस्तूसंग्रहालयास भेट निबंध मराठी
- वसंत ऋतू निबंध मराठी