विद्यार्थी वर्ग कालचा, आजचा – Vidyarthi Varg Kalcha Ani Aajcha in Marathi

‘आयुष्याचे हे चक्र चालती, साद घालते आशा स्वप्नामागून सत्य धावते ही देवाची रेषा’ विद्यार्थी म्हणजे विद्याअर्थी विद्या म्हणजे ज्ञान आणि अर्थी म्हणजे संपादन करणारा समजुन घेणारा पण तोच विद्यार्थी हल्ली दुरदर्शन केबल आणि चित्रपटाच्या विळख्यात गुरफटला गेला आहे. आम्ही लहान असताना म्हणजे साधारण वीस वर्षापूर्वी आमचा विद्यार्थी वर्ग मैदानी खेळ खेळणे, झाडावर चढणे, नदीविहिरीत डूंबणे, शेळ्या हाकणे, गुरांना हिंडविणे यातच आपले मनोरंजन शोधत असे. कुणी शेतातील कामे करुन ही आनंद मिळवत असत. कुणाला फळे भाज्या लावण्याचा छंद असे. सुट्टीत काहीतरी हस्तोद्योग, कला प्राप्त करुन मुली निरनिराळे जिन्नस बनवण्याचा प्रयत्न करत असत पण आज ह्या दुरदर्शन वरील मालिका सर्व विद्यार्थ्यांना एकाच जागेवर जखडून ठेवत आहेत.

शाळेत जाईपर्यंत जेवताना, शाळेतून आल्या-आल्या थोडा वेळ तरी त्यांना दुरदर्शन पाहिल्या शिवाय करमत नाही त्यामुळे मैदानी खेळ, पोहणे, यासारख्या निखळ आनंदाला हा वर्ग मुकला आहे. शिवाय कसरत, व्यायाम न झाल्याने शरीराला योग्य आकार न मिळता उभी आडवी वाढ होते व बसुन बसुन तेलकट पदार्थाचा आस्वाद घेऊन शरीरातील मेद वाढत आहे. दुरदर्शनमुळे कोणत्याही बौद्धिक ज्ञानात भर पडत नसुन नकळत्या वयात प्रौढत्व येते त्याचाच परिणाम विपरित होऊन शिक्षण, करीअर हे उद्धिष्ट न रहाता निरनिराळ्या व्यसनांच्या व व्यभिचारी चाळ्यांना बळी पडतात घरातील भांडण घरातच न रहाता त्याचा. ‘तमाशा’ होतो कारण तोही एक प्रेस्टीज इश्यु झाला आहे. घरातील प्रौढ व्यक्तिंना नमस्कार करणे सोडाच पण चाकु सुऱ्यासारख्या हत्याराने वार केला जातोय. संस्कारक्षम होण्यापेक्षा संस्कार हीन होण्यांतच आजचा वर्ग अग्रेसर आहे. गोड बोलून काका मामा बोलून आपली कामे करुन घेण्यापेक्षा चाकू दाखवुन भाईगिरी करण्यात धन्यता वाटते कारण यांचे ड्रीम मॉडेल चुकार हिंदी चित्रपटातील पडेल हिरो आणि अमुकाने असे केले म्हणून त्याचा तमुक फायदा झाला म्हणून मी देखील केले.

पूर्वी कारणाः शिवाय आई-वडिलांकडे पैसे मागण्याची बिशाद नव्हती पण हल्ली मुलांचीच पाकीटे आईवडिलांपेक्षा जास्त फुगलेली दिसतात कारण आम्हाला लहानपणी जे करता आले नाही त्यापासुन आमची मुले वंचित होऊ नयेत ही भावना परंतु आई वडिलांच्या सरळपणाचा आणि चांगुलपणाचा फायदा घेत हीच मुले त्या पैशाचा वापर सिगरेट, गुटखा किंवा बारगर्ल्स वर उधळताना दिसतात भारत हा देश पूर्वी अविकसित गटात मोडत होता परंतु, आज विकसनशील गटात मोडतो तो कोणत्या अंगाने तेच कळत नाही. लाचलुचपत, दडपशाही, दंडेलशाही, हेच प्रेस्टिज इश्यु आहेत. लाच न घेणारा वेडपट किंवा मुर्ख ठरवला जातो. तो जगात रहाण्याच्या दृष्टीने ‘बाळू’ असतो त्याला आपल्यासाठी चैनी नको असते असे समजले जाते.

मैदानी खेळ न मिळाल्याने हा वर्ग खूप मोठ्या आनंदाला मुकला आहे. त्यामुळे स्थुलपणा, ब्लडप्रेशर यासारख्या जन्मजात रोगांची शिकार होत आहे. थोडा वेळ अभ्यास व इतर वेळेत फक्त टिव्ही वरील कार्टून किंवा रटाळ मालिका पाहाण्याने संध्याकाळचा फावला वेळ तो आपले छंद किंवा वाचन यांना देऊ शकत नाही वाचन नसल्याने व्यावहारिक जगात शुन्य ठरतो.

कालचा विद्यार्थी संध्याकाळी सायं प्रार्थना म्हणून दीपज्योती लावत असे पण हल्ली मुले दुरदर्शन समोरुन नजर न ढळू देता चित्रपटातील गाणी गुणगुणताना आढळतात अशा या विकास की अविकासीत विकाराने ग्रस्त विद्यार्थी स्पर्धा रुपी कसोटयात असमर्थ ठरतो आणि उरते ते केवळ पास असणारे प्रमाणपत्र आणि बेरोजगारी. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवल्यातर आपले दैनंदिन वेळापत्रक बनविल्यास कुठेही यशाच्या शिखरावर चढू शकू, पण त्यासाठी आज गरज आहे. सुजाण पालकांच्या जागृतीची आणि संयमशीलतेची. त्यामुळे नवनिर्माण तरुण सर्वगुण संपन्न तर होईलच पण उच्च विद्या विभूषित होऊन जगातील कुठल्याही स्पर्धेला हिमतीने तोंड देण्यास समर्थ ठरेल.

विद्यार्थी वर्ग कालचा, आजचा

पुढे वाचा:

Leave a Reply