वृक्षांचे महत्व मराठी निबंध – झाडाचे महत्त्व मराठी निबंध – Vruksha Che Mahatva in Marathi

आपल्या पुराणांमध्ये वृक्षांना देव मानलेले आहे. खरोखर, वृक्ष हे देवासारखेच आपल्याला मदत करतात.

वृक्ष उन्हातान्हात थकलेल्या जिवाला वृक्ष शीतल छाया देतात. आपल्याला फळे, फुले व अन्न देतात. ते आपल्याला इमारतींसाठी लाकूड देतात. त्यांच्या लाकडापासून आपण अनेक वस्तू बनवतो. इतकेच नव्हे, तर ते स्वत:चा देह जाळतात आणि माणसांसाठी चूल पेटवतात. काही वृक्षांमुळे आपल्याला औषधे तयार करता येतात.

वृक्षांमुळे पाऊस पडतो. वृक्षांमुळे जमिनीची धूप होत नाही. वृक्षांमुळेच नदयांना व विहिरी-तलावांना पाणी येते.

मात्र माणूस स्वार्थासाठी निष्ठुरपणे वृक्षतोड करतो. वृक्षांची जोपासना करत नाही. यामुळे माणसाचेच जीवन नष्ट होईल. म्हणून वृक्षांचे महत्त्व आपण जाणले पाहिजे.

वृक्षांचे महत्व मराठी निबंध – झाडाचे महत्त्व मराठी निबंध – Vruksha Che Mahatva In Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply