Set 1: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध – Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वृक्षवल्ली वनचरी पक्षीही सुस्वरे आळवीसी वृक्षवल्ली”
लता मंगेशकर उर्फ गानकोकीळेच्या मधूर कंठातून सकाळी रेडीओवरून हे सर्व ऐकताच तन-मन प्रसन्न होऊन उठते परंतु त्या स्वरांचा मथितार्थ ध्यानात येताच मनदेखाली उघड्या मैदानासारखे रूक्ष होते. कारण बोलणे गुणगुणने सोपे आहे पण वृक्ष लावणे व त्यांचे संवर्धन करणे फार कठीण आहे. हिरव्यागार वृक्षांच्या छायेत आराम करणे किती आल्हादायक वाटते पण या लोकसंख्या वाढीमुळे मानवाने वृक्षांच्या मुळावर घाव घातला आहे. सिंमेटच्या जंगलामुळे वृक्षांचे जंगल दुर्मिळ होत आहे. वृक्षलागवडीचे नानाविध उपयोग, फायदे. सामान्यज्ञान व भूगोलाच्या पुस्तकात इतिहासजमा होत चालले आहेत. वृक्ष आपली माय वृक्ष आपूला पिता.
आपण सर्व वृक्षवल्लींची लेकरे आहोत त्यांचे आपले सोयर जन्म जन्मांतरीचे आहे. वृक्षाशी आपले नाते अतुट आहे हे नाते टिकविणे आपणा सर्वांचे परम कर्तव्य आहे. प्रत्येकान. स्वत:चे असे एकध्येय ठेवले पाहिजे की दरवर्षी वृक्षारोपण केले पाहिजे व संवर्धन केले पाहिजे.
Set 2: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध | Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi
निसर्गातील झाडे, वेली, पक्षी, प्राणी हे आपले सोबती आहेत. ते कोणताही भेदभाव न करता सर्वांची सेवा करतात, सर्वांच्या उपयोगी पडतात. निसर्ग आणि मानव याची सोबत अनादिकालापासून आहे, हेच या उक्तीतून संत तुकाराम महाराजांना सांगायचे आहे.
ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव होण्यासाठी आपण झाडांचा आधार घेतो. झाडे, वेली, विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला अन्न देतात, मधुर फळे देतात, मकरंद देतात, सुवासिक फुले देतात, आश्रय देतात. हे सारे ते निरपेक्षबुद्धीने देत असतात. उच्च-नीच, गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता निसर्गराजा मानवाला आपली संपत्ती बहाल करतो.
तुळस, आवळा, हिरडा, अडुळसा, अर्जुन, निलगिरी, सर्पगंधा, आले, हळद, कोरफड अशा कित्येक औषधी वनस्पती आहेत की ज्यांना वैद्यकशास्त्रात फार महत्त्वाचे स्थान आहे. आई आपल्या बाळाची सेवा करताना कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा करत नाही. वृक्षवल्लीही मानवाला खूप काही देतात, जीवनदान देतात. हे देत असताना मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. म्हणूनच काँक्रीटचे जंगल कमी करणे, झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे हे केवळ मानवाच्याच हातात आहे. निसर्ग मानवाचा सोबती आहे. त्याची संगत दीर्घकाळ मिळण्यासाठी त्यांचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे.
Set 3: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे मराठी निबंध – Vrukshavalli Amha Soyari Essay in Marathi
संत तुकारामांनी अभंगात लिहिले आहे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती.’ ते किती खरे आहे.परवाच आमची सहल बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेली होती. तिथे गेल्यावर मला ह्या गोष्टीचा प्रत्यय आला. तिथे असलेली हिरवीगार झाडे, झुडपे, त्या झाडांवर फुललेली फुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे, फळझाडांना लटकणारी फळे, झाडांच्या फांद्यात दडलेल्या पाखरांची मंजुळ किलबिल. खरोखर, तिथले वातावरण एवढे प्रसन्न होते की आम्हा सर्वांच्या मनात आगळावेगळा उत्साह दाटून आला.
भर उन्हाळ्यात आपण शहरातील डांबरी रस्त्यावरून चालत असतो तेव्हाही मध्येच एखादे झाड आले तर त्याच्या सावलीत किती गारवा वाटतो हे आपण सर्वांनी अनुभवलेले आहेच.
खरोखर, हे वृक्ष… ही हिरवीगार वनराजी आपले मित्र आहेत. आपले सारे जीवन ह्या वृक्षवल्लरींवर आणि वनस्पतींवरच अवलंबून आहे. झाडे आपल्याला काय देत नाहीत? झाडे आपल्याला अन्न देतात, सावली देतात. झाडे जेव्हा स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा कार्बन डाय ऑक्साईड घेतात आणि त्या बदल्यात ऑक्सिजन बाहेर सोडून हवा शुद्ध करतात. आपल्या घरातील सामानसुमान लाकडाचे बनलेले असते. काही ठिकाणी तर घराच्या भिंतीसुद्धा लाकडाच्याच असतात. झाडापासून आपल्याला जळण, लाकूड, फळे, लाख, गोंद, रबर, मध असे नानाविध पदार्थ मिळतात. वेगवेगळ्या फुलांचे आपण गजरे बनवतो, लग्नात आणि अन्य समारंभात सुशोभीकरणासाठी फुलांचा उपयोग होतो. फळांपासून जॅम, मोरंबा, लोणची बनतात.
हिरडा, बेहडा, ज्येष्ठीमध, वावडिंग असे अनेक औषधी पदार्थ आपल्याला झाडांपासूनच तर मिळतात. झाडापासून कापूस मिळतो. रेशीम जरी किड्यापासून मिळत असले तरी तो किडा तुतीच्या झाडांच्या पानावरच राहातो. झाडांमुळे जमिनीची धूप होत नाही. दुष्काळाचे मान कमी होते, झाडांची मुळे जमिनीला घट्ट पकडत असल्यामुळे पुराच्या वेळेस फार नुकसान होत नाही. एवढेच नव्हे तर मेल्यावरही दहन करण्यासाठी लाकडाचाच वापर केला जातो. आता हल्ली विद्युतदाहिनीचा वापर कुठे कुठे होऊ लागला आहे म्हणा.
तर ही अशी झाडे.. आपल्याला खूप हवीहवीशी वाटणारी. सुखाची सावली देणारी. घरे बांधताना, रस्ते बांधताना आपल्याला वृक्षतोड करावी लागते तेव्हा त्या बदल्यात दुसरीकडे झाडे लावली पाहिजेत. लावलेली झाडे जगवली पाहिजेत. मला तर वाटते की जिथे जागा मिळेल तिथे झाडे लावली पाहिजेत. काही लोक उघडेबोडके डोंगर दत्तक घेतात आणि तिथे वृक्षारोपण करतात. सामाजिक संस्थांनी ह्या बाबतीत पुढे आले पाहिजे.
पुढे वाचा:
- वृक्ष आपले मित्र मराठी निबंध
- जर वीज नसती तर मराठी निबंध
- विहिरीचे मनोगत निबंध मराठी
- विवाहाचे दृश्य निबंध मराठी
- विद्यार्थ्यांनी राजकारण करावे काय?
- विद्यार्थी वर्ग कालचा, आजचा
- विज्ञान एक वरदान निबंध मराठी
- विज्ञान युगातील माणूस मराठी निबंध
- विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध
- वायु प्रदूषण निबंध मराठी
- लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम निबंध मराठी
- बेकारी एक भीषण समस्या मराठी निबंध
- वाचाल तर वाचाल निबंध मराठी