Set 1: स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती – Swami Dayanand Saraswati Nibandh Marathi

भारतात खूप प्राचीन काळापासून अनेक सत्पुरूषांचा जन्म झाला आहे. अशा थोर, वीर, ज्ञानी लोकांची भारत जणू काही खाणच आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अशा थोर पुरूषांपैकीच एक होते स्वामी दयानंद सरस्वती.

महर्षी दयानंद सरस्वती ह्यांचा जन्म गुजरात प्रांतातील टंकारा नावाच्या गावात इ.स १८२४ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अंबाशंकर होते. लहानपणी दयानंद सरस्वतींचे नाव मूळशंकर असे ठेवण्यात आले होते. त्यांचे शिक्षण घरच्या घरीच करून घेण्यात आले. त्यांची बुद्धी खूपच कुशाग्र असल्यामुळे वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांना संस्कृत भाषा चांगली अवगत झाली होती.

स्वामीजींचे वडील शिवभक्त होते. त्यांच्यासोबत एकदा शिवमंदिरात ते गेले होते तेव्हा शिवशंकराच्या पुढील नैवेद्य एक उंदीर खाताना त्यांना दिसला. तेव्हा त्यांना वाटले की भगवान शंकर जर सा-या सृष्टीचे तारणहार आहेत तर त्यांना आपल्या नैवद्याचे रक्षण कसे करता येत नाही? तेव्हापासून त्यांच्या मनात मूर्तिपूजेबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या. त्यांनी त्या विषयी आपल्या वडिलांना प्रश्न विचारले परंतु वडिलांना त्यांच्या शंकांचे निरसन करता आले नाही.

त्यातच त्यांची आवडती बहीण आणि काकू ह्यांचा स्वर्गवास झाला, त्यामुळे त्यांच्या मनाला खूपच विरक्ती आली. ख-या ईश्वराची प्राप्ती करायची आणि मृत्यूवर विजय मिळवायचा ह्या उद्देशाने त्यांनी स्वामी विराजानंदांना आपले गुरू केले. तेव्हा विराजानंदांनी त्यांच्यापाशी वचन मागितले की शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचे जीवन वेदांचा प्रसार करण्यात व्यतीत कराल.महर्षी दयानंदांनी ते मान्य केले.

अशा त-हेने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वैदिक धर्मप्रसाराची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली. सर्वसामान्य जनतेला वेदांचा उपदेश केला, मूर्तिपूजेला प्रखर विरोध केला. ईश्वराचे रूप एकच आहे असा प्रचार केला. हजारो हिंदूंना धर्मांतर करण्यापासून वाचवले.

स्त्रीशिक्षणाचा प्रसार केला. बालविवाहाला विरोध केला. सतीप्रथेचे खंडन केले. विधवांनी पुनर्विवाह केला पाहिजे अशा मताचे ते होते. त्यांनी जातीभेदाला विरोध केला. अस्पृश्यतेला विरोध केला. अनाथाश्रम आणि विधवाश्रम काढले. वैदिक शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी गुरूकुल काढले. त्यापैकी गुरूकुल कांगडी हरिद्वार हे प्रसिद्ध आहे. आता ते विद्यापीठ बनले आहे.

त्यांनी मांडलेल्या आधुनिक विचारांमुळे अनेक सनातनी लोक त्यांचे झाले. त्यांना मारण्याची अनेक कारस्थानं रचली गेली परंतु त्यात ते यशस्वी झाले नाहीत. परंतु सरतेशेवटी ३० ऑक्टोबर, १८८३ रोजी त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला त्यातून मात्र ते वाचू शकले नाहीत.

ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य मात्र सदैव राहील.

Set 1: स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी – Swami Dayanand Saraswati Nibandh Marathi

भारत हा ऋषिमुनींचा देश आहे. किती तरी थोर आध्यात्मिक गुरू, उच्च कोटीचे संत आणि समाज सुधारक इथे होऊन गेले. राम, कृष्ण, बुद्ध, महावीर, गुरु गोविंद सिंग या संतानी येथील संस्कृतीचे जतन व प्रसार केला. स्वामी दयानंद सरस्वती हे असेच एक थोर समाजसुधारक.

महर्षि दयानंद सरस्वतीचा जन्म गुजरात प्रांतातील टंकारा नामक गावात इ. स. १८२४ मध्ये झाला. त्यांच्या पित्याचे नाव अंबा शंकर होते. लहानपणी त्यांचे नाव मूलशंकर ठेवण्यात आले. त्यांचे शिक्षण घरीच झाले. बुद्धी कुशाग्र असल्यामुळे १२ व्या वर्षीच त्यांना संस्कृतचे चांगले ज्ञान झाले. स्वामीजींचे वडील शिवभक्त होते. बहीण आणि काकूच्या मृत्यूमुळे स्वामीजी विरक्त झाले. खऱ्या ईश्वराची प्राप्ती आणि मृत्यूवर विजय प्राप्त करण्याची इच्छा ठेवून त्यांनी स्वामी विराजानंदाला आपले गुरू बनविले. शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेत गुरूने त्यांना आपले संपूर्ण जीवन वेद प्रचारात घालवीन असे वचन मागितले.

गुरूच्या आज्ञेनुसार ते धर्म प्रचारासाठी निघाले. साधू, ब्राह्मण, विद्वानांशी शास्त्रचर्चा केली. सामान्य जनतेला वेदांचा उपदेश केला, मूर्तिपूजेला विरोध केला आणि ईश्वराचे एकच रूप आहे याचा प्रचार केला. हजारो हिंदूंना, मुसलमान, ख्रिश्चन होण्यापासून वाचविले. स्त्री शिक्षणाचा प्रचार केला. बालविवाहाला विरोध केला. सतीप्रथेचे खंडन केले. विधवांनी पुनर्विवाह करावा या मताचे ते होते. जातिभेदाला विरोध केला. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी अनाथाश्रम व विधवाश्रम काढले. वैदिक शिक्षणाच्या प्रसारासाठी गुरुकुल उघडले. ते “गुरुकुल कांगडी हरिद्वार” या नावाने प्रसिद्ध आहे. आता ते एक नामंकित विद्यापीठ बनले आहे.

आधुनिक विचारांचा प्रचार करण्यामुळे अनेक सनातनी लोक त्यांचे शत्रू झाले. त्यांना मारण्याची अनेक कारस्थाने रचली गेली पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. अशाच एका दुर्घटनेत त्यांच्या दुधात पारा मिसळून ते दूध त्यांना देण्यात आले. खूप इलाज करूनही ते ते विषमुक्त झाले नाहीत. ३० ऑक्टोबर १८८३ ला वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

स्वामीजींनी धर्मप्रचारार्थ अनेक पुस्तके लिहिली. उदा० संस्कार विधी, सत्यार्थ प्रकाश, आर्याभिविनय इ. त्यांनी हिंदी भाषा व वेदांचा प्रचार केला. परंपरावादी आणि वाईट रुढींच्या अंधारात बुडालेल्या जनतेला ज्ञानाचा प्रकाश दिला.

स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती

पुढे वाचा:

Leave a Reply