हिरवी संपत्ती मराठी निबंध – Hirvi Sampatti Marathi Essay
आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी आपल्याला सांगितले होते की, ‘युवकांनो, खेड्याकडे चला!’ आपला देश कृषिप्रधान आहे. शेती हीच आपली खरी संपत्ती आहे. ही हिरवी संपत्ती जेवढी निर्माण करू तेवढे आपण अधिक समृद्ध होऊ. पण अनेक वेळा आपण औदयोगिक उत्पादनाच्या मागे लागतो. त्यामुळे हिरव्या उत्पादनाकडे आपले दुर्लक्ष होते.
सजीवांच्या जीवनासाठी हिरवी संपत्ती अतिशय आवश्यक असते. ती आपली भूक भागवते. त्याचबरोबर आपल्या जिभेचे लाडही पुरवते. तिखट मिरची, आंबट चिंच, कैरी, रसाळ आंबा, तुरट आवळा आणि कडू कडुलिंब हे षड्रस या हिरव्या संपत्तीतच येतात. या हिरव्या वनस्पतींमुळे म्हणजे झाडांमुळे हवेतील प्रदूषणही कमी होते. सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण मिळते आणि हिरव्या रंगाने डोळ्यांना शांती व तृप्ती मिळते.
हिरव्या संपत्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्यातील औषधी गुण. आज आयुर्वेदाला जगात मान्यता मिळाली आहे. आयुर्वेद लोकप्रिय झाल्याने औषधी वनस्पतींपा खूप मागणी आहे. आपला देश अशा आयुर्वेदीय संपत्तीने समृद्ध आहे.
पुढे वाचा:
- स्वावलंबन मराठी निबंध
- स्वामी दयानंद सरस्वती निबंध मराठी माहिती
- स्वातंत्र्यानंतरचा भारत मराठी निबंध
- स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी
- स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध
- स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग निबंध मराठी
- स्पर्धेचे युग मराठी निबंध
- स्त्री शिक्षणाचे महत्व निबंध मराठी
- सौर ऊर्जा निबंध मराठी
- सूर्य संपावर गेला तर निबंध मराठी
- सूर्य संतापला तर निबंध मराठी
- सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी
- सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी