Set 1: स्वावलंबन मराठी निबंध – Swavalamban Essay in Marathi

समर्थ रामदासांनी म्हणून ठेवलेच आहे की ‘जो दुस-यावरी अवलंबिला, त्याचा कार्यभाग बुडाला,’ हे अगदी खरेच आहे. स्वावलंबन हा शब्द ‘स्व अधिक अवलंबन’ ह्या दोन शब्दांची संधी होऊन तयार झाला आहे. ह्याचा अर्थ असा की आपण स्वतःच्या क्षमता अशा वाढवाव्यात आणि जोपासाव्यात की त्यामुळे आपली कामे आपल्याला स्वतःला करता आली पाहिजेत.

स्वावलंबी व्यक्तीला दुस-या व्यक्तींच्या आधाराची उठल्यासुटल्या गरज लागत नाही. आपण माणसे समाजात राहातो. आपल्याला इतरांकडून भावनिक आणि मानसिक आधाराची गरज असते. कधीकधी शारीरिक आणि आर्थिक मदतीचीही गरज लागते हे अगदी मान्य असले तरी ही मदत कुठवर घ्यायची? किती काळ दुस-यांच्या चांगुलपणावर जगायचे ह्यालाही मर्यादा असते.

जी कामे आपल्याला शक्य आहेत त्यासाठी दुस-या कुणावर अवलंबून न राहाणे आणि ती स्वतःहून करणे हेच इष्ट असते. मात्र स्वावलंबनासाठी तशीच जाज्वल्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाची गरज असते. स्वावलंबनाचे धडे शाळेत शिकवता येत नाहीत की स्वावलंबी व्हा असा नुसता उपदेश करून फायदा होत नाही. स्वालंबन हा एक संस्कार असतो आणि घरातील आणि असपासच्या मोठ्या लोकांच्या वागण्यातून तो लहान मुलांच्या मनावर होतो. स्वावलंबन माणसाला सकारात्मक बनवते, त्यामुळे त्याचे पाय जमिनीवरच राहातात.

स्वावलंबनामुळे यशाचा मार्ग खुला होतो. अपयशापासूनही धडा घेऊन चिकाटीने आपला मार्ग अनुसरणे हे स्वावलंबनामुळेच शक्य होते. स्वावलंबनाचा अर्थ आहे स्वतःवर विश्वास ठेवणे. केवळ नशीबावर अवलंबून न राहाता आपल्या क्षमतांचा विकास करणे. सिंह जर झोपून राहिला तर हरीण काही आपोआप त्याच्या तोंडात येऊन पडत नाही.सिंहालाही शिकार करावीच लागते.

‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ हे वागणे चुकीचेच आहे. जगातील सर्व महापुरूष स्वावलंबीच होते. इतरांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, लालबहादुर शास्त्री ही सर्व मोठी माणसे स्वतःवर अवलंबून राहिली म्हणूनच ती मोठी बनली. बांगला देशच्या युद्धात इंदिरा गांधींनी स्वतःवर श्रद्धा ठेवली म्हणूनच त्या युद्धात त्या यशस्वी झाल्या.

जो स्वतःसाठी कष्ट घेतो त्याच्यामागे प्रत्यक्ष देव उभा राहातो. अशी व्यक्ती सतत धडपड करते, हरली तरी चिकाटी सोडत नाही त्यामुळे तिला यश प्राप्त होते. म्हणूनच समाजसेवेचे शिक्षण देताना शिकवले जाते की ‘कुणाला मासा देऊ नका परंतु मासेमारी करायला जरूर शिकवा. मासा दिल्याने त्याची एक दिवसाची भूक भागेल. पण त्याला मासेमारी करायला शिकवले तर त्याची रोजचीच भूक भागेल आणि तो आत्मसन्मानाने जीवन कंठूशकेल.’
म्हणूनच स्वावलंबन फार महत्वाचे आहे.सेवा करण्यासाठी आले. त्यांनी गडचिरोली येथे उभारलेले सर्च उर्फ शोधग्राम ही

Set 2: स्वावलंबन मराठी निबंध – Swavalamban Nibandh in Marathi

स्वावलंबनाचा अर्थ आहे आपली क्षमता आणि आपले प्रयत्न यावर अवलंबून राहून कार्य करणे. स्वावलंबी व्यक्तीस इतरांच्या आधाराची गरज भासत नाही. स्वावलंबनासाठी दृढ इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमांची आवश्यकता असते. स्वावलंबनाचे धडे शाळेत शिकविले जात नाहीत. किंवा कुणी उपदेश केल्यामुळे स्वावलंबी होता येत नाही. जीवनातील गरजाच स्वावलंबनाच्या विकासास कारणीभूत ठरतात.

स्वावलंबन मनुष्याला वास्तववादी आणि आशावादी बनविते व यशाचा मार्ग खुला करते. आपल्या अपयशापासून धडा घेऊन पुन्हा यश मिळविण्यासाठी नवे मार्ग आपण शोधतो. स्वावलंबी व्यक्ती जमिनीवर राहून आकाशात उडण्याचा प्रयत्न करते. स्वावलंबनाचा एक अर्थ आहे स्वत:वर विश्वास ठेवणे असा ही आहे. नशिबावर अवलंबून न राहता आपल्या क्षमतांचा विकास करणे. परिश्रम केल्याशिवाय सिंहालाही आपली शिकार मिळत नाही. अर्थात, परिश्रमानेच सर्व कार्ये पूर्ण होतात. केवळ मनांतील इच्छांनी नाही.

जगात जितके महापुरुष होऊन गेले ते सर्व स्वावलंबी होते. इतरांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. अब्राहम लिंकन झोपडीतून निघून अमेरिकेचे राष्ट्रपती बनले. नेपोलियन गरीब कुटुंबात जन्मला पण त्याने अर्ध्या जगावर राज्य केले. एकलव्य स्वप्रयत्नाने धनुर्धर बनला. लाल बहादुर शास्त्री निर्धनतेची नदी पार करून भारताचे प्रधानमंत्री बनले. हा सर्व स्वावलंबनाचाच परिणाम आहे.

इंग्रजीत एक म्हण आहे- “God helps those who help themselves”. म्हणजे जी व्यक्ती स्वत:ला मदत करते तिला ईश्वर पण मदत करतो. अशी व्यक्ती जीवनात कधीही कुठेही अयशस्वी होत नाही. जीवनात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा ती फायदा घेते. जर अशी संधी आली नाही तर ती उत्पन्न करते. स्वावलंबी व्यक्तीची आपल्या प्रत्येक कार्यावर निष्ठा असते. कारण तिचे प्रत्येक कार्य तिच्या स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून असते. उद्दिष्ट प्राप्तीची भावना अडचणी दूर करते. ही व्यक्ती त्वरित निर्णय घेण्यास सक्षम असते. स्वावलंबनाचा मार्ग आपल्याला सफलतेकडे घेऊन जातो.

पुढे वाचा:

Leave a Reply