स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग निबंध मराठी – Swachh Varg Sundar Varg Marathi Nibandh
आमची शाळा ही तालुक्यातील एक छोटी शाळा आहे. शाळेची इमारत बैठी आहे. शाळेसमोर मोकळे पटांगण आहे. यंदा सुट्टीत इमारतीला रंग दिला आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाली तेव्हाच मुख्याध्यापकांनी जाहीर केले की,यंदा ‘स्वच्छ वर्ग-सुंदर वर्ग’ ही स्पर्धा घेतली जाईल.
शाळेने काही शिक्षकांचे एक मंडळ त्यासाठी नेमले होते व ते वेळोवेळी पाहणी करून वर्षअखेरीला मार्चमध्ये स्पर्धेचा निकाल जाहीर करणार होते. म्हणजे प्रत्येकावर वर्षभर आपला वर्ग स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी होती.
रोज शाळेत आल्या आल्या आम्ही वर्गात सफाई करत होतो. आठवडा संपला की,सर्व भिंती,छप्पर स्वच्छ करत होतो. कारण, तळमजला असल्यामुळे वर्गात धूळ खूप येत असे. फळ्यावर सुंदर चित्रे काढत असू. दररोज नवीन सुवचन फळ्यावर लिहिले जाई.
याशिवाय वर्गात आम्ही सावलीत वाढणाऱ्या रोपट्यांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. दसऱ्याला आम्ही वर्ग सजवला होता. याशिवाय प्रत्येक विदयार्थी स्वत:ची, आपल्या दप्तराचीही काळजी घेत असे. वर्गाबरोबर आम्ही ग्रंथालयही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविकच वर्षअखेरीला ‘स्वच्छ वर्ग, सुंदर वर्गाचे’ बक्षीस आम्हीच पटकावले!
पुढे वाचा:
- स्पर्धेचे युग मराठी निबंध
- स्त्री शिक्षणाचे महत्व निबंध मराठी
- सौर ऊर्जा निबंध मराठी
- सूर्य संपावर गेला तर निबंध मराठी
- सूर्य संतापला तर निबंध मराठी
- सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी
- सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी
- सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
- सुट्टी मराठी निबंध मराठी
- मी सुई बोलतेय
- सिनेमा – चित्रपट मराठी निबंध
- मी सिंहगड बोलतो आहे
- सिंहगड बोलू लागला तर निबंध मराठी