स्वातंत्र्यानंतरचा भारत मराठी निबंध – Swatantra Nantarcha Bharat Marathi Nibandh

आदिमानव हातात कुन्हाड घेऊन शिकार करतानाचे चित्र पाहिले की लक्षात येते की हाच का तो मानव वल्कले घालून प्राण्यांचे कच्चे मांस खाऊन गुहेत राहणारा! वहाणाऐवजी तळपायाला झाडाचा पाला बांधून रानोमाळ शिकारीच्या शोधात भटकणारा. आणि आजचा हा मानव उत्क्रांतीच्या अत्युच्च टप्प्यावरील शिखराला पादाक्रांत करणारा.

आजचा विज्ञानयुगातील मानव जमीनीवर चालत नसुन उंच हवेत उडत असतो, पक्ष्याप्रमाणे आकाशात गिरक्या घेत असतो. जणूकाही प्रगतीच्या विमान
बसून अवकाशातुन पृथ्वीचे अवलोकनच करतो आहे. जगभरातील मानव विज्ञानाच्या संशोधनाचे फलश्रुत रुपच आहे. परंतु असा प्रश्न पडतो की हा मानव खऱ्या अर्थाने प्रगत आहे का ?

१५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रजांच्या छळाच्या आणि गुलामीच्या शृंखला गळून पडल्या. १५० वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले. थोडे फार अत्याचार, अन्याय सहन करावे लागले परंतु अशिक्षित, धर्ममातंड, कर्मकांडात अडकलेला भारतीय समाज इंग्रजांच्या आधुनिक विचारसरणीने थोडासा प्रगतीच्या मार्गाने जाऊ लागला. इंग्रजी शिकलेल्या व इंग्रजीचे वारे प्यालेल्या समाजसुधारकांनी आपल्या बंधुभगिनींना, दलितांना तळागाळातुन वर काढण्यासाठी पुर्ण आधुनिक नव्हे परंतु अंधश्रद्धेच्या जोखडातुन मुक्त करण्यासाठी शिकवण देण्याचा जणू काही वसा घेतला आणि हा समाज सुधारणेच्या मार्गावरुन धावू लागला. अज्ञानाचा पडदा झुगारुन देवून साक्षरतेचा मंत्र जपू लागला. विधवा पुनर्विवाह होऊ लागले. सतीबंदी, बालविवाह बंदी, केशवपन, पडदा पद्धत, चूल आणि मूल यांच्या कचाट्यातून स्त्रिया मुक्त झाल्या आणि ज्योतिबा फूले, शाहू महाराज, आगरकर यांसारख्या सुधारकांच्या पावलावर पाऊल ठेवून साक्षरतेचे धडे गिरवू लागल्या.

ज्योतिबा फूले यांचे विचार म्हणूनच अमूल्य वाटतात. घरातील पुरुष शिकला तर तोच एकटा साक्षर होतो. परंतु स्त्री शिकली तर आख्खे घर साक्षर बनते याचेच ज्वलंत उदाहरण आज घराघरांत पहायला मिळते कारण पुरुष कमावता असल्यामुळे तो साक्षर असूनही मुलांना ज्ञान देवू शकत नाही परंतू स्त्री मुलांना ज्ञान व संस्कार देते. खऱ्या अर्थाने पुढील पिढी सबल व साक्षर बनवते.

पुढे वाचा:

Leave a Reply