स्वच्छता तेथे प्रगती मराठी निबंध – Essay on Swachhta Tethe Pragati in Marathi
माझी आजी नेहमी सांगत असे की, ‘हात फिरे, तेथे लक्ष्मी वसे.’ केवढा मोठा अर्थ आहे या शब्दांत! आपण स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच चालत येते. आपण हे कधीच लक्षात घेत नाही. आपले वर्तन सुधारत नाही.
वैयक्तिक स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. नीट आंघोळ केली नाही, तर त्वचारोग होतील. तोंडाची स्वच्छता ठेवली नाही, तर दात किडतील. केसांची स्वच्छता राखली नाही, तर केसांत उवा-लिखा होतील.
व्यक्तिगत स्वच्छतेइतकीच घराची, गावाची, देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालये हवीत. तरच गावात स्वच्छता राहील. गावातील लोक नदी-तलावाचे पाणी खराब करतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. त्या पाण्यामुळे रोगराई पसरते.
अनेक थोरामोठ्यांनी, गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. आता शासनानेही सर्वत्र ‘गाडगेबाबा स्वच्छता योजना’ राबवली आहे. त्यामुळे गावाचा, पर्यायाने देशाचा विकास होईल.
पुढे वाचा:
- स्वच्छ वर्ग सुंदर वर्ग निबंध मराठी
- स्पर्धेचे युग मराठी निबंध
- स्त्री शिक्षणाचे महत्व निबंध मराठी
- सौर ऊर्जा निबंध मराठी
- सूर्य संपावर गेला तर निबंध मराठी
- सूर्य संतापला तर निबंध मराठी
- सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी
- सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी
- सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
- सुट्टी मराठी निबंध मराठी
- मी सुई बोलतेय
- सिनेमा – चित्रपट मराठी निबंध
- मी सिंहगड बोलतो आहे