स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी – Swachate Che Mahatva Nibandh in Marathi

स्वच्छता हा निरोगी आयुष्याचा पाया आहे. म्हणून आपण स्वच्छता बाळगली पाहिजे.

आपले अंग आपण स्वच्छ राखले पाहिजे. नखे वाढू देऊ नये. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावेत. शौचाहून आल्यावर साबण लावून हात धुतले पाहिजेत. पाण्याची व जेवणाची भांडी स्वच्छ राखली पाहिजेत.

तसेच, आपला परिसर स्वच्छ राखला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी धुंकू नये. कोठेही कचरा टाकू नये. सार्वजनिक पाणवठ्यात आंघोळ करू नये. त्या ठिकाणी भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरे धुणे या गोष्टी करू नयेत.

अस्वच्छतेमुळे रोगजंतूंचा प्रसार होतो. साथीचे रोग पसरतात. रोगांमुळे माणसे कमकुवत बनतात. आजारपणामुळे खर्च वाढतो. रोगराईमुळे काही वेळा माणसे मरण पावतात. हे सर्व टाळायचे असेल, तर स्वच्छता पाळलीच पाहिजे.

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी – Swachate Che Mahatva Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply