Set 1: वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध – Vartaman Patre Taknara Mulga Essay in Marathi

या वर्षी ‘वक्तशीर विदयार्थी’ हे पारितोषिक नववीमधील हरेशला मिळाले. शाळेत त्याचे खूप कौतुक झाले. कारण तो एकही दिवस शाळेत उशिरा आला नाही. त्याने गृहपाठाच्या वया व निबंधाच्या वड्या नेहमी ठरवलेल्या वेळीच पूर्ण केल्या. तो इतका वक्तशीर कसा याचे काहीजणांना आश्चर्य वाटते.

या हरेशला मी ओळखतो. तो आमच्या घराजवळच राहतो. तो रोज सकाळी घरोघर वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करतो. त्यासाठी तो पहाटे साडेचार वाजता उठतो. आंघोळ वगैरे आटोपतो आणि नाक्यावर जातो. तेथे वर्तमानपत्रे ताब्यात घेतो आणि घरोघर पोहोचवतो. तेथून तो लगबगीने घरी येतो.

घरात पाणी भरायला आईला मदत करतो. मग न्याहरी करतो आणि शाळेत जातो. त्याचा हा सर्व कार्यक्रम ठरलेला आहे. नेहमी तो वक्तशीरपणे शाळेत हजर होतो.

हरेशला स्वत:च्या परिस्थितीची जाणीव आहे. त्याला पहाटे लवकर उठून काम करावे लागते. आपल्याजवळ वेळ कमी आहे, हे लक्षात घेऊन तो आपली कामे वेळच्या वेळी करतो. त्याला खूप शिकायचे आहे; खूप मोठे व्हायचे आहे.

Set 2: वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध – Vartaman Patre Taknara Mulga Essay in Marathi

गेली दोन वर्षे रवी आमच्याकडे वर्तमानपत्रे टाकतो; पण त्याची व माझी फारशी ओळख झाली नव्हती. कारण तो जेव्हा त्याचे काम करून जातो, तेव्हा मी साखरझोपेत असतो, पण महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो बिल घ्यायला येतो, तेव्हा बऱ्याच वेळा आमच्या गप्पा झाल्या आहेत.

रवी या वर्षी तेरावीत शिकत आहे. त्याला अभ्यास खूप आवडतो. घरच्या गरिबीमुळे गेली दोन वर्षे रवी सकाळी वर्तमानपत्रे टाकतो. त्याबद्दल त्याला दरमहा २०० रु. मिळतात. शिवाय संध्याकाळी तो एका पुस्तकाच्या दुकानात कामाला जातो. त्याबद्दल त्याला महिना ५०० रुपये मिळतात. संध्याकाळी दुकानात खूप गर्दी असते. पण त्याला पुस्तके खूप आवडत असल्याने, हे काम तो मनापासून करतो.

त्याला सकाळी लवकर उठावे लागते. या कामामुळे अनेक लोकांशी त्याचा परिचय होतो. त्यांतील काहीजण त्याला अभ्यासात मदत करतात. आपणही लेखक होऊन वर्तमानपत्रात लिहावे, पुस्तके लिहावीत, अशी त्याची महत्त्वाकांक्षा आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply