सौर ऊर्जा निबंध मराठी – Saur Urja Nibandh in Marathi

ऊर्जेचे विविध स्रोत आहेत. काही स्रोत पारंपरिक आहेत; तर काही स्रोत अपारंपरिक आहेत. पेट्रोलजन्य पदार्थांपासून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती केली जाते. दगडी कोळसा, पेट्रोल यांचे साठे कधी ना कधी संपणार आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करण्यावर मर्यादा येते.

सूर्य हा ऊर्जेचा अपरंपरागत स्रोत आहे. सूर्यापासून निर्माण होणारी ऊर्जा कितीतरी पटीने वाया जाते. सूर्याच्या ऊर्जेचा वापर पूर्वीपासून कमी प्रमाणात होत आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केल्यास मानवी जीवनात अनेक बदल होतील.

आज सौर ऊर्जेवर चालणारी अनेक उपकरणे निघाली आहेत. सौर बत्ती, सौर कुकर, सौर शेगडी अशा कितीतरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वस्तू निर्माण झाल्या आहेत. सौर ऊर्जेवर चालणारी वाहने व बॅटऱ्याही निर्माण व्हायला लागल्या आहेत.

सौर ऊर्जेचे तंत्रज्ञान आजही बाल्यावस्थेत आहे. महागड्या उपकरणांमुळे त्यांचा वापर गोर-गरिबांना परवडणारा नाही. हे तंत्रज्ञान विकसित केल्यास सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढेल आणि पर्यावरणाचे संतुलन टिकायला मदत होईल.

सौर ऊर्जा हे मानवाला मिळालेले वरदान आहे. सूर्याच्या उष्णतेचा जास्तीत जास्त वापर करणे मानवी अस्तित्वाच्या हिताचे आहे.

सौर ऊर्जा निबंध मराठी – Saur Urja Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply