सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी – Surya Mavala Nahi Tar Nibandh in Marathi
एकदा काय झाले! सूर्यास्ताची वेळ टळून गेली, पण सूर्यच मावळेना. घड्याळ पुढे धावत होते. सर्वजण सूर्यास्ताची वाट पाहात होते. पण अंधारच होईना. संध्याकाळ नाही मग रात्र कोठली?
आकाशात सतत सूर्य तळपत होता. सर्वत्र प्रखर प्रकाश. सगळे रंग लुप्त झाले होते. पिवळाधम्मक प्रकाश. इतर रंग लाल, तांबडा, गुलाबी, निळा हे उरलेच नाही. हळूहळू उष्णता वाढत चालली. चटके बसू लागले. सावली तर नाहीच नाही. माणसांना व प्राण्यांना हे सहन होत नव्हते. झाडेही होरपळून निघाली.
रात्र होत नव्हती. दिवस संपत नव्हता म्हणून माणसेही कामे करून थकत होती. झोपायला गेली तर सगळीकडे प्रकाश. त्यामुळे झोप येत नव्हती. फुले सुकून गेली होती. चांदण्या व चंद्र दिसत नव्हते. त्यामुळे छोटी मुले चांदोमामाला विसरली होती. अंधार कसा हेच सर्वजण विसरले होते. सर्व कामे विस्कळीत झाली होती.
कोणाचा पायपोस कोणात नव्हता. रात्रीचे १२ म्हणावे की दिवसाचे १२ म्हणावे हेच समजत नव्हते. सगळा गोंधळ होत होता.
शेवटी माणसाने देवाला विनंती केली की, देवा, आम्ही खूप थकलो. आम्हाला हा प्रकाश असह्य वाटतो. तेव्हा देवाला कीव आली. त्याने स्वर्गातले बटण दाबले व मग लगेच रात्र झाली व सर्व शांत शांत झाले.
पुढे वाचा:
- सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी
- सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
- सुट्टी मराठी निबंध मराठी
- मी सुई बोलतेय
- सिनेमा – चित्रपट मराठी निबंध
- मी सिंहगड बोलतो आहे
- सिंहगड बोलू लागला तर निबंध मराठी
- सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
- साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी निबंध मराठी
- साथीचे आजार माहिती मराठी निबंध
- साक्षरतेची मोहीम निबंध मराठी
- साक्षर जनता भूषण भारता निबंध मराठी
- सहशिक्षण निबंध मराठी