सूर्य संतापला तर निबंध मराठी – Surya Santapla Tar Nibandh Marathi
जगात माणसाला नेहमी स्वत:च्या कर्तृत्वाचा फार गर्व असतो. ‘हे मी केलं, ते मी केलं,’ असे तो मोठमोठ्याने ओरडून सांगतो आणि त्यावेळी आपण खरोखरी किती परावलंबी आहोत, याचा त्याला विसर पडतो.
आता सूर्याचीच गोष्ट पाहा ना ! भगवान सूर्यदेव आहेत म्हणून पृथ्वीतलावरील प्राणी जगू शकतात. सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. पण सूर्य आपल्याला देत असलेल्या सर्व गोष्टींची महती अतिपरिचयाने आपल्याला वाटेनाशी होते. समजा हाच सर्वदायी सूर्य आपल्यावर रागावला तर… आणि आकाशात उगवलाच नाही, तर …
तर सर्वत्र काळोख पसरेल. चोवीस तास रात्रच रात्र. काही दिवसांनी वातावरणातील उष्णता संपेल आणि अतोनात थंडी वाजू लागेल. सूर्य उगवलाच नाही तर रोगराई वाढेल, झाडांची वाढ खुंटेल. सूर्य नाही तर, पाण्याची वाफ कशी होणार? वाफ नाही तर पाऊस कसा पडणार?
समजा सूर्य संतापला आणि संतापाने तो अधिक लालेलाल झाला – तर? तर त्याचे चटके माणसाला आणि सर्व प्राणिजगताला बसू लागतील. कालांतराने ते चटके असह्य होतील आणि सारी सजीव सृष्टी होरपळून नष्ट होईल, या विचारांनी मनाचा थरकाप होतो व नकळत आपण उद्गारतो, ‘ नको रे बाबा, सूर्याचा संताप !’
पुढे वाचा:
- सूर्य मावळला नाही तर निबंध मराठी
- सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी
- सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
- सुट्टी मराठी निबंध मराठी
- मी सुई बोलतेय
- सिनेमा – चित्रपट मराठी निबंध
- मी सिंहगड बोलतो आहे
- सिंहगड बोलू लागला तर निबंध मराठी
- सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
- साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी निबंध मराठी
- साथीचे आजार माहिती मराठी निबंध
- साक्षरतेची मोहीम निबंध मराठी
- साक्षर जनता भूषण भारता निबंध मराठी