सरावाचे महत्त्व निबंध मराठी – Importance of Practice Essay Marathi

सराव म्हणजे एखादी गोष्ट पुन:पुन्हा करणे, मनापासून करणे; कारण ती आपल्याला आत्मसात करायची असते. जे खेळाडू खेळात पटाईत होऊ इच्छितात, ते सतत त्या खेळाचा सराव करतात. सचिन तेंडुलकर, अभिनव बिंद्रा यांची चरित्रे वाचली, तर आपल्याला कळेल की सरावाविना यशप्राप्ती होत नाही.

कुठल्याही कलावंताचे आत्मचरित्र पाहा. हे कलावंत त्या कलेतील अत्युच्च शिखर गाठतात. त्यामागे त्यांचा आयुष्यभराचा सराव असतो. ‘गाता गळा, शिंपता मळा, लिहिता लेखनकळा’ ही उक्ती हेच सांगत नाही का? ज्या कलावंतांना गुरू भेटत नाही, ते एकलव्याप्रमाणे सराव करतात.

कोणत्याही क्षेत्रात तुम्हांला अत्युच्च शिखर गाठायचे असेल, तर सराव हवाच. जी माणसे सराव सोडून देतात वा सराव करण्याचा कंटाळा करतात, ती आपल्या क्षेत्रात कधीच यशस्वी होत नाहीत.

सरावाचे हे महत्त्व आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे. जो विषय आपल्याला येत नसतो, आवडत नसतो, त्याचा सराव अवश्य करावा. कारण

‘असाध्य ते साध्य। करिता सायास। कारण अभ्यास। तुका म्हणे।।’

सरावाचे महत्त्व निबंध मराठी – Importance of Practice Essay Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply