समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मराठी निबंध – Samudra Kinara Var Ferfatka Essay in Marathi

मुंबईत आत्याकडे गेल्यावर आमचा समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका असतोच. कधी दादरच्या, तर कधी गिरगावातील; तर कधी जुहूच्या चौपाटीवर आम्ही जातो.

समुद्राचे भव्य रूप पाहून प्रथम आपण थक्क होतो. त्याच्या उसळणाऱ्या लाटा आपल्याला आनंद देतात व त्यांचे भयही वाटते. संध्याकाळच्या वेळी समुद्राच्या वाळूतून अनवाणी चालायला मला खूप आवडते. पुन्हा पुन्हा चालावे,

धावावे, उड्या माराव्यात असे वाटत राहते. समुद्रकाठचा सूर्यास्त मला खूप मोहित करतो. मी तेथील वाळूतून विविध रंगांचे व आकारांचे शंखशिंपले गोळा करतो.

सुट्टीच्या दिवशी मात्र समुद्रकिनाऱ्यावर माणसांची खूप गर्दी उसळते. ओहोटीच्या वेळी सागराचे पाणी मागे सरकते. मग तेथे माणसांचा सागर उसळतो. समुद्रकिनाऱ्यावर भेळ, चिवडा, ऊसगंडेरी, शहाळी, बर्फाचा गोळा विकणाऱ्यांची खूप गर्दी असते. आत्याचा मुलगा दादा आम्हांला हे सर्व घेऊन देतो.
समुद्रकिनारी उंटावर बसून फेरीही मारायला मिळते. भरतीची वेळ जवळ आली की, समुद्राचे पाणी वाढते, मग आम्ही घराकडे परत फिरतो.

समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मराठी निबंध – Samudra Kinara Var Ferfatka Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply