कपालभाती प्राणायाम मराठी माहिती – Kapalbhati in Marathi

कपालभाती प्राणायाम मराठी माहिती, Kapalbhati in Marathi
कपालभाती प्राणायाम मराठी माहिती, Kapalbhati in Marathi

कपालभाती कृती मराठी

 1. पुढे पाय पसरून बसा.
 2. उजवा पाय डाव्या मांडीवर व डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून पद्मासन घालून बसा.
 3. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून कमरेत ताठ बसा.
 4. मग सुरूवातीस दीर्घ श्वास व नाकावाटे झटक्याने श्वास बाहेर सोडून जलद रेचक करा व पोटाच्या स्नायूंना आत धक्का द्या.
 5. नाकाने जलद उच्छ्वास केल्यावर मग लगेच पोट ढिले सोडा व फुप्फुसाच्या स्थितिस्थापकतेमुळे आपोआप श्वास आत घेतला जाऊ द्या.
 6. श्वास आत जाताच पुन्हा पोटाला आत धक्का देत झटक्याने उच्छ्वास करा. असे अकरा ते एकवीस वेळा करून चार ते पाच वेळा दीर्घ श्वसन करा व पुन्हा जलद रेचकांची पुनरावृत्ती करा. अशा रीतीने कपालभातीच्या तीन आवृत्या करा व एका आवृत्तीत एकशे आठ पर्यंत जलद उच्छ्वास करण्याचा अभ्यास वाढवा.

वरील अभ्यास सामान्य अभ्यासू करिता आहे. ज्यांना कपालभातीपासून अधिक लाभ मिळवावयाचे असतील त्यांनी कपालभातीच्या आवृत्तीनंतर दीर्घ श्वास जोडून जालंधर , मूळ व उडिडयानबंधसहित बाह्यकुभंक करावा. यथाशक्ती कुंभकानंतर चार-पाच वेळा दीर्घ श्वसन करून कपालभातीची पुढील आवृत्ती करावी.

कपालभाती करताना घ्यायची काळजी किंवा दक्षता

1) कपालभाती करताना पाठीच्या कण्याला बाक येऊ देता कमरेत ताठ बसा.
2) कपालभातीच्या पूर्ण आवृत्तीत छाती वर-खाली होऊ देता स्थिर ठेवून फक्त पोटाचे स्नायूंना आत धक्का द्या व ढिले सोडा.
3) पोटाला आत धक्का देताना फक्त बेंबीपासून खालच्या स्नायूंना धक्का द्या.
4) सुरुवातीस जलद उच्छ्वास करून पोटाला धक्का देणे, मग पोट ढिले सोडून श्वास आत जाऊ देणे या क्रिया सावकाश करून नीट जमल्यावर जलद करा.
5) कपालभातीचा अभ्यास नेहमी रिकाम्यापोटी करावा.
6) जलनेतीनंतर कपालभाती करण्यापूर्वी उडिडयाबंधाच्या तीन आवृत्या करून मग कपालभाती करावी.

कपालभातीचे फायदे – Kapalbhati Benefits in Marathi

 1. श्वासपटल (Diaphragm) व पोटाचे स्नायू अधिक बळकट होतात.
 2. रक्ताभिसरण क्रियेस वेग येऊन शरीरास शुद्ध रक्त जलद पोचविले जाते.
 3. ध्यानपूर्वी कपालभाती केल्यास एकाग्रता साधण्यास मदत होते.
 4. जलनेती केल्यानंतर नाकाच्या पोकळीत शिल्लक राहिलेले पाणी बाहेर काढून नाक कोरडे होण्यास मदत होते.
 5. कपालभातीचा अभ्यास प्राणायामातील पूरक रेचक प्रमाणबद्ध व दीर्घ होण्यास सा्यभूत ठरतो.
 6. प्राणशक्तीवर ताबा येणे, कुण्डलिनी शक्ती जागृत होणे इत्यादी फायदे होतात.

कपालभाती प्राणायाम मराठी विडिओ 

अजून वाचा:

Leave a Reply