कुटुंब नियोजन मराठी निबंध | Kutumb Niyojan Nibandh in Marathi

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली. करीत आहे. परंतु आपल्या अपेक्षेप्रमाणे विकासाचा दर कधीच राहिला. नाही कारण लोकसंख्येचा विस्फोट झाला. लोकसंख्या वाढीचा वेग फारच जलद आहे. अशाच प्रकारे लोकसंख्या वाढत राहिली तर नैसर्गिक साधने कमी पडतील. कारण, निसर्गाच्या सीमा ठरलेल्या असतात. ज्या वेगाने लोकसंख्या वाढते त्या वेगाने साधने वाढत नाहीत. परिणामी गरजेपेक्षा साधने कमी पड़तात.

देशात अराजकता, बेकारी, भूकबळी यांचे तांडवनृत्य चालू आहे. दुष्ट रुढी पाळल्या जात आहेत. जर भावी विनाशापासून भारत व भारतीयांना वाचावयाचे असेल तर लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रित करावा लागेल. कुटुंब नियोजनातच कुटुंबकल्याण आहे. कुटुंबाचे प्रश्न सोडविणे म्हणजेच देशाचे प्रश्न सोडविणे होय. कुटुंब नियोजनाचा प्रत्यक्षपणे राष्ट्रकल्याणाशी संबंध आहे.

भारतात प्राचीन काळापासून कुटुंबाच्या आकाराचा प्रश्न चर्चेत राहिला आहे. सावित्रीने स्वत:साठी १०० भाऊ आणि १०० पुत्र यमराजाकडे मागितले होते. कौरव १०० होते. इक्ष्वाकु वंशाचा राजा सगराला साठ हजार पुत्र होते. रावणाला एक लाख पुत्र आणि सव्वालाख नातू होते असे म्हणतात. ज्यावेळी लोकसंख्या कमी होती त्यावेळी समृद्धी, सुरक्षितता आणि विकासासाठी लोकसंख्या वाढणे फार आवश्यक होते परंतु आर्य चाणक्याच्या मते,

“एकोअपि गुणवान, पुत्रः निर्गुणैश्चशतैर्वरम।
एक श्चन्द्रस्तमों हन्ति न च तारा सहस्त्रशः॥

अर्थात् १०० गुणहीन पुत्र असण्यापेक्षा एकच गुणवान पुत्र असणे चांगले कारण एकच चंद्र अंधार नष्ट करतो पण हजारो तारे अंधार नष्ट करू शकत नाहीत. नीति शास्त्रानुसार

“एकेन पुत्रेण जातेन सिहीस्वपिति निर्भयं।
दशर्भिपुत्रेः सहभारंवहति रासभीः॥”

अर्थात एक पुत्र जन्माला घालून सिंहीण निर्भयपणे झोपते आणि गाढविणीला १० गाढवे जन्माला घालूनही भारच वाहावा लागतो.

कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाची व्यावहारिक बाजू ही आहे की एका जोडप्याने एक किंवा दोनच अपत्यांना जन्म द्यावा. त्यांचे चांगले पालनपोषण करावे यासाठी जनजागरण करावे. मुले दोनच व्हावीत यासाठी संयमाचा किंवा ब्रह्मचर्याचा अवलंब करावा. परंतु ही गोष्ट असंभव नसली तरी कठीण आहे. ऋषीमुनीसुद्धा संयम ठेवू शकले नाहीत तर सामान्यांची काय कथा? पण विज्ञानाने असे अनेक उपाय शोधून काढले आहेत ज्याचा अवलंब करून अपत्य जन्मावर बंधन घालता येते. सर्वात चांगला उपाय हा की स्त्री किंवा पुरुषाने संततिनियमनाचे ऑपरेशन करून ध्यावे. पुरुषांच्या ऑपरेशनला नसबंदी आणि स्त्रियांच्या ऑपरेशनला नसबंदी म्हणतात.

कुटुंबनियोजनाचा हा सर्वोत्तम उपाय आहे. याखेरीज स्त्रियांसाठी संततिनियमनाच्या गोळ्या पण उपलब्ध आहेत. मासिक पाळी संपल्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोज एक गोळी जेवणानंतर घ्यावयाची असते. जोपर्यंत या गोळ्या चालू असतील तोपर्यंत मूल होणार नाही. लूप किंवा कॉपर टी लावूनही मूल होत नाही पण यात योनिमार्गात जखमा होण्याची शक्यता असते. म्हणून याचा वापर कमी प्रमाणात होतो. पुरुष निरोध वापरून संततिनियमन करतात. याखेरीज संततिनियमनाचे इतर अनेक मार्ग आहेत.

भारत सरकार खेड्यापाड्यांतून कुटुंब-नियोजनाचा प्रसार करीत आहे. छोट्या कुटुंबाचे फायदे सांगत आहे. मुलामुलीच्या विवाहाचे वय निश्चित करण्यात आले आहे. मुलीचे १८ व्या वर्षी आणि मुलाचे २१ व्या वर्षी लग्न करावे. त्यापूर्वी केल्यास तो दंडनीय गुन्हा आहे. कुटुंबनियोजनाची साधने दवाखान्यात मोफत मिळतात. नसबंदीसाठी सरकार पुरुषांना प्रोत्साहित करते. वेळोवेळी अनेक पोस्टर मोहिमा घेण्यात येतात. निबंध व भाषणाच्या या विषयावर स्पर्धा घेतल्या जातात. भारत सरकारने कुटुंबनियोजनाच्या उद्योगांसाठी अनेक कर सवलती दिल्या आहेत. विश्वातूनही या कार्यासाठी मदत मिळते.

भारत सरकार बस स्टैंड रेल्वे स्टेशनसारख्या ठिकाणी जनसंख्येचे घड्याळ लावून ठेवते ज्यामुळे जनतेला लोकसंख्या वाढीचा वेग समजतो. व ते कुटुंब नियोजनाचा विचार करू लागतात.

भारतात कुटुंबकल्याण कार्यक्रम म्हणावा तितका यशस्वी झालेला नाही. द्रौपदीच्या वस्त्राप्रमाणे लोकसंख्या वाढतच चालली आहे. कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाची गती मंद असण्याचे कारण आहे गरिबी, निरक्षरता, अंधविश्वासूपणा, बटुविवाह, बालविवाह, मृत्युदर नियंत्रण इत्यादी मुले देवाची देणगी मानली जातात. गरिबांना लोकसंख्या वाढविण्याचा अभिमान वाटतो. त्यांना वाटते जितकी मुले जास्त होतील तितकी ती अधिक कमावतील. परंतु ते हे विसरतात की त्यांना खायलाही जास्त लागेल. भारतात अनेक धर्मांचे अनुयायी राहतात. काही लोक धार्मिक कारणासाठी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला विरोध करतात. ते लोक गर्भपात करणे, गर्भनिरोधक गोळ्या घेणे वा साधने वापरणे हा ईश्वराच्या कार्यात हस्तक्षेप मानतात. असे समजणे चूक आहे.

काळाबरोबर परिस्थिती पण थोडीशी बदललेली आहे. ग्रामीण भागातील अशिक्षित लोकांना आता कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटू लागले आहे. धार्मिक संकुचित विचार ते सोडत आहेत. तरी भारताची इतकी मोठी लोकसंख्या आणि सरकारची अपुरी साधने ही याची मर्यादा आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनीही आपला मदतीचा पुढे करणे जरूर आहे. कुटुंब नियोजनात केवळ व्यक्तीचे, कुटुंबाचे, जातीचे, समाजाचे, राष्ट्राचेच हित नसून, , संपूर्ण मानवतेचेच यामुळे कल्याण होते. म्हणून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, गरिबी नष्ट करण्यासाठी, भारताला महाशक्ती बनविण्यासाठी कुटुंब नियोजन अनिवार्य आहे.

“थोड़ी मुले असोत गुणवान
कुटुंबाचे हो कल्याण”

पुढे वाचा:

Leave a Reply