‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’, या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?

काही लोक दुसऱ्याला चांगले वागण्याचा, सत्कार्य करण्याचा, कार्य सिद्धीस नेण्याचा उपदेश करतात. आपण मात्र उपदेश केल्याप्रमाणे वागत नाहीत.

लोकांना उपदेश करणे सोपे असते; पण त्या उपदेशाप्रमाणे आपण आपले आचरण ठेवणे कठीण असते. ‘नेहमी सत्य बोला’, ‘इतरांना त्यांच्या कामात मदत करा’, ‘खूप कष्ट करा’ अशा प्रकारचे उपदेश देणारे खूप लोक असतात; पण असे उपदेश देणारे लोक स्वत: त्याप्रमाणे वागत नाहीत. केवळ इतरांनाच उपदेश करण्यात अशा लोकांना धन्यता वाटते.

‘अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे’ असे सभेमध्ये सांगणारे कित्येक लोक समाजात वावरताना अस्पृश्यता पाळतात. व्यसनाधीनतेवर ‘ब्रह्मज्ञान’ सांगणारे सायंकाळी नशेत हरवलेले असतात. सत्याचा उपदेश देणारे घटके-घटकेला खोटे बोलत असतात. दुसऱ्याला सन्मार्ग दाखवणारे स्वत: मात्र कुमार्गी असतात. म्हणूनच जगाला उपदेश करणाऱ्या आणि त्याप्रमाणे न वागणाऱ्या लोकांना नेहमीच असे म्हटले जाते की, ‘लोका, सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण.’

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’, या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?

पुढे वाचा:

Leave a Reply