राष्ट्रीय एकात्मता निबंध मराठी – Rashtriya Ekatmata Essay in Marathi
आपल्या भारतात विविध जातींचे, विविध पंथांचे, निरनिराळ्या धर्मांचे लोक राहतात. त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. त्यांचे आर्थिक स्तर निराळे आहेत. त्यांची राहणी, त्यांचे आवडते छंद, खाणेपिणे वेगळे आहे, तरी सर्वजण एकाच राष्ट्राचे म्हणजे भारताचे नागरिक आहेत.
भारत हे एक राष्ट्र आहे. विविधतेत एकता हेच भारताचे खास वैशिष्ट्य. म्हणून तर परमपूज्य साने गुरुजी म्हणतात की, भारतीय संस्कृती हे सहस्र पाकळ्यांचे कमळ आहे. पण तरीही आम्ही एकत्रच आहोत. भारत हे एक राष्ट्र आहे. भारताच्या या विविधतेचा आम्हांला अभिमान आहे.
भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. ‘सत्यमेव जयते’ हे या राष्ट्राचे ब्रीदवाक्य आहे. तर ‘जन-गण-मन’ हे भारताचे राष्ट्रगीत आहे. अशोकचक्रांकित तिरंगा हा आमचा राष्ट्रध्वज आहे. कोणत्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीत आम्ही सर्व एकत्र असतो. एकजुटीने शत्रूला विरोध करतो. आम्ही वेगवेगळे असलो, तरी भारताचे ऐक्य जपतो. जगाला याचेच मोठे नवल वाटते.
पुढे वाचा:
- राष्ट्रभाषा हिंदी मराठी निबंध
- रात्र रागावली तर निबंध मराठी
- राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
- राजभाषा मराठी निबंध
- रस्त्यावरील भटक्या कुत्र्याची कैफियत
- रवींद्रनाथ टागोर निबंध मराठी
- रमजान ईद निबंध मराठी
- रक्षाबंधन निबंध मराठी
- रंगांची दुनिया मराठी निबंध
- योगासने मराठी निबंध
- युवकांचा असंतोष मराठी निबंध
- या हो या, चंद्रदेवा ! मराठी निबंध
- म्हाताऱ्या बैलाचे मनोगत मराठी निबंध
- मोबाईल निबंध मराठी