Set 1: राष्ट्रभाषा हिंदी मराठी निबंध – Essay on Hindi Our National Language in Marathi
आपल्या भारतात खूपच विविधता आहे. अनेक धर्म, पंथ, जाती, वंश, पोशाख, चालीरीती आणि भाषा ह्यांचे आपल्या इथे अगदी कडबोळेच झाले आहे असे मला कधीकधी वाटते. तरीही सा-या जगात भारत हा असा देश आहे ज्याच्या विविधतेतही एकता आहे. त्या एकतेमागे धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक अशी बरीच कारणे आहेत.
स्वातंत्र्यानंतर हे ऐक्य वाढावे, परस्परसामंजस्य वाढावे म्हणून आपण बरीच पावले उचलली. त्यात एक पाऊल होते ते म्हणजे आपली राष्ट्रभाषा कुठली ते ठरवण्याचे. कारण त्यामुळे जनता काय बोलते आहे ते एकमेकांना समजू शकले असते. शेवटी आपल्या मनात काय आहे ते सांगण्याचे भाषा हेच एक माध्यम आहे ना.
आपण पृथ्वीतलावर जन्म घेतो तेव्हा काही काळाने आपल्याला आसपासच्या अवकाशाचे भान येते. आपल्या मातेची भाषा हीच आपली भाषा होते. मग ह्या भाषारूपी साधनाने आपण इतरांना आपल्या मनातले सांगतो आणि त्यांना काय म्हणायचे आहे ते समजून घेतो. एक राष्ट्र म्हणून उभारी घेण्यात आपल्याला समान भाषा नसल्याची अडचण होऊशकली असती.त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी एकच राष्ट्रभाषा असणे ही आपली गरज होती. ती गरज आपण हिंदी ह्या भाषेला राष्ट्रभाषा मानून पुरी केली.
आपण हिंदी भाषेला राष्ट्रभाषा मानले कारण ती भाषा अधिकांश भारतीय जनतेला समजते. ती बोलण्यात आणि लिहिण्यात सोपी आहे. तिच्यात सरलता आहे. ती भाषा वापरून आपण भारतात कुठेही जाऊ शकतो आणि जनसामान्यांशी संवाद करू शकतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत की देशाची एकता हवी असेल तर सर्वांना समजणारी हिंदी आपण आपलीशी केली पाहिजे. म्हणूनच २६ जानेवारी, १९५० ह्या दिवसापासून हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे असे आपण घोषित केले आहे.
आज दक्षिणेतील राज्यांना विशेषतः तामिळनाडू राज्याला हिंदीचे वर्चस्व नको वाटते. त्या ऐवजी ते इंग्रजी भाषेला अधिक महत्व देतात. परंतु इंग्रजी भाषा ही काही म्हटले तरी परकीय भाषाच आहे. गुलामगिरीची मानसिकता ती जोपासते. त्यामुळे आपल्या राष्ट्रभाषेला म्हणजेच हिंदीला आपणच महत्व दिले पाहिजे. अधिकाधिक व्यवहार त्याच भाषेतून केले पाहिजेत. भाषावार प्रांतरचनेमुळे प्रत्येक राज्यात तिथल्या स्थानिक भाषेला पहिला दर्जा दिला जातो. त्यानंतरचा दुसरा दर्जा हा हिंदीला मिळाला पाहिजे, इंग्रजीला नाही. ते केवळ आपल्याच हातात आहे.
Set 1: राष्ट्रभाषा हिंदी मराठी निबंध – Essay on Hindi Our National Language in Marathi
भाषा हे संपर्काचे, संवादाचे सशक्त माध्यम आहे. प्रत्येक देशाची एक सामान्य भाषा असते व या भाषेत देशातील सर्व व्यवहार पार पाडले जातात. भारत एक फार मोठे राष्ट्र आहे. येथे भाषा, धर्म, जाती, पंथ, पोशाख यांची विविधता आहे. परंतु जगात भारत हा एकच असा विलक्षण देश आहे की ज्याच्या विविधतेत एकता अंतर्भूत आहे. याची धार्मिक ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजनैतिक, भौगौलिक इत्यादी अनेक कारणे आहेत. ऐक्याच्या अनेक साखळ्या आहेत. त्यापैकीच एक साखळी आहे, हिंदी भाषा.
२६ जानेवारी १९५० पासून भारतीय राज्यघटना अमलात आली व देवनागरी लिपीत लिहिली जाणारी हिंदी भाषा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यात आली. हीच भाषा आपल्या राष्ट्राचा आत्मा, भारतीय सभ्यता आणि संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे माध्यम, राष्ट्रीयता आणि ऐक्याचा मंत्र फुकणारी शक्ती, देशवासीयांमध्ये प्रेम आणि विवेक जागृत करणारी, स्वाभिमान उत्पन्न करणारी आणि राष्ट्रीय गौरव दर्शविणारी भाषा होय. राष्ट्रभाषेच्या अभावी देश सभ्यता, सांस्कृतिक जीवन, ज्ञान विज्ञानात स्वावलंबी होऊ शकत नाही. तसेच नागरिकांचे स्वतंत्र चिंतन आणि संशोधन होऊ शकत नाही.
परंत आपण आपल्या राष्ट्रभाषेचा योग्य तेवढा मान राखत नाहीत. सरकारने याकडे गंभीरपणे पाहिले पाहिजे. हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळे आपण तिचा प्रसार, प्रचार केला पाहिजे. हिंदी भाषा प्राथमिक वर्गापासून महाविद्यालयीन वर्गांपर्यंत अनिवार्य करावी. राजकीय कार्यासंबंधीचा सर्व कारभार व पत्रव्यवहार हिंदी भाषेत व्हावा. संस्था आणि रेल्वे स्टेशनची नावे प्रादेशिक भाषेबरोबरच हिंदीतही लिहिली जावीत. निमंत्रण पत्रिका हिंदीत छापाव्यात. नावांच्या पाट्या हिंदीत लिहाव्यात. न्यायालयाचे कामकाज हिंदीत व्हावे. हिंदी भाषेच्या प्रचार प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम वृत्तपत्रे आणि दूरदर्शन आहे. त्यांची प्रगती म्हणजे हिंदीची प्रगती.
अन्य देश आपल्या राष्ट्रभाषेचा उपयोग करून प्रगतीच्या शिखरावर विराजमान होऊ शकतात. तर भारतही हिंदी ही राष्ट्रभाषा स्वीकारून मागासलेला राहील कसा? केवळ १४ डिसेंबरला ‘हिंदी दिवस’ साजरा, करून समाधान मानू नये तर तिच्या प्रगतीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे.
पुढे वाचा:
- रात्र रागावली तर निबंध मराठी
- राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
- राजभाषा मराठी निबंध
- रस्त्यावरील भटक्या कुत्र्याची कैफियत
- रवींद्रनाथ टागोर निबंध मराठी
- रमजान ईद निबंध मराठी
- रक्षाबंधन निबंध मराठी
- रंगांची दुनिया मराठी निबंध
- योगासने मराठी निबंध
- युवकांचा असंतोष मराठी निबंध
- या हो या, चंद्रदेवा ! मराठी निबंध
- म्हाताऱ्या बैलाचे मनोगत मराठी निबंध
- मोबाईल निबंध मराठी
- मोगल उद्यानात फेरफटका निबंध मराठी