राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी – Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi

गोरगरिबांचा, दीनदलितांचा कनवाळू राजा म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे, तेच राजर्षी शाहू महाराज ! शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.

राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या हाती असलेल्या राज्यसत्तेचा उपयोग आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी केला. आपल्या राजवटीच्या काळात त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सढळ हाताने मदत केली. विविध जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे काढली. राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. महाराजांच्या या धोरणामुळे बहुजन समाजातील, दलित समाजातील अनेक विद्यार्थी पुढे आले. त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला.

राजर्षी शाहू महाराज हे पुरोगामी आणि क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी स्पृश्यास्पृता, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सतत संघर्ष केला.अस्पृश्यांना शिक्षणाची व नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. गंगाराम कांबळे सारख्या दलिताला हॉटेल काढून दिले. लोक त्या हॉटेलाल चहा प्यायला जावेत म्हणून महाराज स्वतः तेथे जाऊन चहा पिऊ लागले. .

शाहू महाराजांनी राधानगरी येथे भोगावती नदीवर धरण बांधले. शाहू मिलची स्थापना केली. कळंबा तलाव बांधून कोल्हापूरच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. महाराजांचे चौफेर व्यक्तिमत्त्व शब्दांत गुंफणे कठीणच. अशा या महामानवाचा मृत्यू १९२२ मध्ये झाला.

पुढे वाचा:

Leave a Reply