मराठी कथा लेखन लबाड कोल्हा – Marathi Katha Labad Kolha

एकदा एक कोल्हा एका विहिरीत पडला. तिथे तो थंडीने गारठून गेला. वर कसे जावे त्याला कळेना. इतक्यात एक बोकड विहिरीच्या काठाशी आला आणि आत डोकावून पाहू लागला. त्याने कोल्ह्याला विचारले, “काय कोल्होबा, तिथं कसं काय वाटतंय ?” कोल्हा लबाड होता. तो म्हणाला, “अहो बोकडदादा! विहिरीतील पाणी फार गोड आहे. येथून हलूच नये असे वाटते. तुम्ही पण आत या.” बोकडाला कोल्ह्याचे म्हणणे खरे वाटले. विहिरीत उडी मारून तो पाणी पिऊ लागला. लबाड कोल्हा पटकन बोकडाच्या पाठीवर चढला व विहिरीबाहेर आला. बोकड मात्र विहिरीतच अडकून पडला.

मराठी कथा लेखन लबाड कोल्हा – Marathi Katha Labad Kolha

पुढे वाचा:

Leave a Reply