रुपयाची आत्मकथा मराठी निबंध – Autobiography of a Money Essay in Marathi

मात्र नमस्कार! ओळखलेत ना मला? अहो माझे नाव रुपया! मी कुबेराच्या तिजोरीत रहातो. कुबेर हा माझा स्वामी, माझा मालक. लोक मला लक्ष्मी या नावानेही ओळखतात. नाव जरी एकच असले तरी माझी रुपे निरनिराळी आहेत. जसे, रुबल, पाऊंड, येन, लिरा, मार्क, डॉलर, दिनार इ. लोक माझ्या मार्फत व्यापार करतात. मला देऊन आपल्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी घेतात. कधी-कधी मी एका ठिाणाहून दुसऱ्या ठिकाणी कितीतरी अंतर पार करुन जातो. तर कधी एखाद्या बँकेत किंवा कपाटात नुसताच पडून असतो. मला सगळयात आनंद होतो तो मी मंदिरात असताना.

जुन्या काळी माझे रंगरूप बरेच वेगळे होते. सोने किंवा चांदीपासून मला बनविले जात असे. माझे महत्त्वही तसे कमीच होते. पण काळ बदलला आणि माझे महत्त्व वाढत गेले. लोक मला मान देऊ लागले. मी सर्व जगाचे आकर्षणाचे केंद्र बनलो. मी ज्याच्याजवळ जातो त्याची जीवन-पद्धती, विचार, कपडे, खाणे-पिणे, सगळे काही बदलते, माझ्या उपस्थितीने सर्व दु:खांचा नाश होतो. मी ज्या व्यक्तिजवळ असेन ती अचानक श्रीमंत, बुद्धिमान, गुणी बनते. मत्सर, गर्व, स्पर्धा, राग, तुच्छता यांसारख्या भावना वाढिस लागतात. अनेकदा लोक मला मिळविण्यासाठी अवैध मार्ग स्वीकारतात. प्रत्येक व्यक्ती, मग ती गरीब असो वा श्रीमंत, स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा मोठी, मला मिळवण्याच्या स्पर्धेत असते. माझ्या प्राप्तीसाठी ते वेडयासारखे धावत सुटतात. माझ्या उपस्थितीने लोकांना सुरक्षित वाटते. मी नसलो तर मित्र वा नातेवाईकही दूर पळतात. माझ्यासाठी अनेकदा खून, मारामाऱ्या होतात.

मात्र प्रत्येक गोष्टीला अपवाद हा असतोच. माझ्या प्राप्तीसाठी प्रत्येक जण अवैध गोष्टी करतो असे नाही. काही लोक अतिशय कष्टाने मला मिळवतात व समाधानी असतात. काही लोक माझा उपयोग चांगल्या कार्यासाठी करतात. इस्पितळे, शाळा बांधतात किंवा अन्य समाजोपयोगी कामे करतात. अशा वेळी मला खूप आनंद होतो. तर अशी आहे माझी कहाणी.

रूपयाची आत्मकहाणी मराठी निबंध – Autobiography of a Money Essay in Marathi

परवाच रेडियोवर गाणे लागले होते ‘फिरते रूपयाभवती दुनिया, फिरते, रूपयाभवती दुनिया.’

ते गाणे ऐकताऐकता माझ्या मनात आले की हे किती खरे आहे? हातात पैसा असेल तर जगात तुम्हाला मान मिळेल. पैसा जवळ नसेल तर तुमचे हाल कुत्राही खाणार नाही. असा विचार करता करता त्या दिवशी मी झोपून गेलो आणि माझ्या स्वप्नात चक्क रूपयाच आला. तो रूपया मला त्याची कहाणी सांगू लागला. तो म्हणाला,” अरे, मनोज, असा दचकू नकोस, मी रूपया बोलतोय. मी तुला माझी गोष्ट सांगायला आलोय. खूप पूर्वी ना रूपया किंवा पैसा अशी काही संकल्पनाच नव्हती.

तेव्हा लोक वस्तूच्या बदल्यात वस्तूच द्यायचे. परंतु ते फार गैरसोयीचे होऊ लागले. म्हणून मग कवड्यांचा वापर करून वस्तू विकल्या जाऊ लागल्या. जेव्हा माती भाजण्याची युक्ती माणसाला सापडली तेव्हा मातीची नाणी तो बनवू लागला. परंतु ही नाणी फुटायची भीती होती. त्यानंतर सोने, चांदी असे मौल्यवान धातूंचा शोध माणसाला लागला आणि त्या धातूंचे तुकडेच पैसा म्हणून वापरले जाऊ लागले. नंतर मोठमोठे राजे आपले चित्र असलेल्या सोन्याच्या किंवा चांदीच्या मोहरा काढू लागले.

आपल्या भारतातील कित्येक ऐतिहासिक ठिकाणी उत्खनन केले गेले तेव्हा अशी जुनी तांब्याची, चांदीची आणि सोन्याची नाणी सापडली आहेत. त्या नाण्यांवरून इतिहाससंशोधकांनी त्या त्या राजाचा काळही ठरवला आहे.

इंग्रजांनी भारतात ढबू पैसा, पावली, अधेली आणि रूपया अशी नाणी काढली होती. स्वातंत्र्यानंतर भारतसरकारने खास वेगळी नाणी आणि नोटा काढल्या. ही नाणी खास सरकारी टाकसाळीत बनतात आणि नोटाही वेगळ्या छापखान्यातून छापून घेतल्या जातात. अशी एक टाकसाळ तुमच्या महाराष्ट्राय नाशिक येथे आहे.

सध्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नकली नोटांचे मोठे संकट आपल्या देशाला भेडसावते आहे. त्यापासून मुक्ततेसाठी आपण आपल्या नोटांची पटकन नक्कल करता येणार नाही असे तंत्रज्ञान पाश्चात्य देशांकडून आयात केले आहे.

आजकाल महागाई फार वाढली आहे. त्यातच सर्वांना चंगळ करण्याची सवय लागलेली असल्यामुळे खर्च फार होतो. अशा वेळी माझी म्हणजे पैशाची बचत करायला हवी. बचतीसाठी वेगवेगळ्या योजना असतात. परंतु अधिक व्याजाच्या मोहापायी फसू नये. मुलांच्या शिक्षणासाठी, नव्या घरासाठी, आजारपणासाठी आणि म्हातारपणासाठी म्हणून पैसा बाजूला ठेवावा.

म्हणजे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही.चल, आता मी तुझा निरोप घेतो.” बोलताबोलता रूपया माझ्या नजरेसमोरून नाहीसा झाला आणि मीही स्वप्नातून जागा झालो.

रूपयाचे मनोगत – पैश्याची आत्मकथा निबंध – Autobiography of Money in Marathi

परवाच रेडियोवर गाणे लागले होते . फिरते रूपयाभवती दुनिया, फिरते,रूपयाभवती दुनिया.

ते गाणे ऐकताऐकता माझ्या मनात आले की हे किती खरे आहे? हातात रूपया म्हणजेच पैसे असतील तर जगात तुम्हाला मान मिळेल. पैसा जवळ नसेल तर तुमचे हाल कुत्राही खाणार नाही. असा विचार करता करता त्या दिवशी मी झोपून गेलो आणि माझ्या स्वप्नात चक्क रूपयाच आला. तो रूपया मला त्याची कहाणी सांगू लागला. तो म्हणाला,” अरे, मनोज, असा दचकू नकोस, मी रूपया बोलतोय. मी तुला माझी गोष्ट सांगायला आलोय. खूप पूर्वी ना रूपया किंवा पैसा अशी काही संकल्पनाच नव्हती. तेव्हा लोक वस्तूच्या बदल्यात वस्तूच द्यायचे. परंतु ते फार गैरसोयीचे होऊ लागले. म्हणून मग कवड्यांचा वापर करून वस्तू विकल्या जाऊ लागल्या. जेव्हा माती भाजण्याची युक्ती माणसाला सापडली तेव्हा मातीची नाणी तो बनवू लागला. परंतु ही नाणी फुटायची भीती होती. त्यानंतर सोने, चांदी असे मौल्यवान धातूंचा शोध माणसाला लागला आणि त्या धातूंचे तुकडेच पैसा म्हणून वापरले जाऊ लागले. नंतर मोठमोठे राजे आपले चित्र असलेल्या सोन्याच्या किंवा चांदीच्या मोहरा काढू लागले.

आपल्या भारतातील कित्येक ऐतिहासिक ठिकाणी उत्खनन केले गेले तेव्हा अशी जुनी तांब्याची, चांदीची आणि सोन्याची नाणी सापडली आहेत. त्या नाण्यांवरून इतिहाससंशोधकांनी त्या त्या राजाचा काळही ठरवला आहे.

इंग्रजांनी भारतात ढबू पैसा, पावली, अधेली आणि रूपया अशी नाणी काढली होती. स्वातंत्र्यानंतर भारतसरकारने खास वेगळी नाणी आणि नोटा काढल्या. ही नाणी खास सरकारी टाकसाळीत बनतात आणि नोटाही वेगळ्या छापखान्यातून छापून घेतल्या जातात. अशी एक टाकसाळ तुमच्या महाराष्ट्राय नाशिक येथे आहे. सध्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नकली नोटांचे मोठे संकट आपल्या देशाला भेडसावते आहे. त्यापासून मुक्ततेसाठी आपण आपल्या नोटांची पटकन नक्कल करता येणार नाही असे तंत्रज्ञान पाश्चात्य देशांकडून आयात केले आहे.

आजकाल महागाई फार वाढली आहे. त्यातच सर्वांना चंगळ करण्याची सवय लागलेली असल्यामुळे खर्च फार होतो. अशा वेळी माझी म्हणजे पैशाची बचत करायला हवी. बचतीसाठी वेगवेगळ्या योजना असतात. परंतु अधिक व्याजाच्या मोहापायी फसू नये. मुलांच्या शिक्षणासाठी, नव्या घरासाठी, आजारपणासाठी आणि म्हातारपणासाठी म्हणून पैसा बाजूला ठेवावा. म्हणजे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही.चल, आता मी तुझा निरोप घेतो..

बोलताबोलता रूपया माझ्या नजरेसमोरून नाहीसा झाला आणि मीही स्वप्नातून जागा झालो.

रुपयाची आत्मकथा मराठी निबंध – Autobiography of a Money Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply