Marotrao Kannamwar Information in Marathi: मारोतराव कन्नमवार हे भारतीय राजकारणी होते. २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ या काळात ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या त्याच कार्यकाळात त्यांचे निधन झाले.

ते चंद्रपूर जिल्ह्यातील साओली विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी होते. ते एक प्रभावशाली राजकारणी होते आणि १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान त्यांच्या विनंतीनुसार चंद्रपूर जिल्ह्याने महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक सोने गोळा केले.

मारोतराव कन्नमवार (दुसरे मुख्यमंत्री)-Marotrao Kannamwar Information in Marathi (1)
मारोतराव कन्नमवार (दुसरे मुख्यमंत्री)-Marotrao Kannamwar Information in Marathi (1)

मारोतराव कन्नमवार माहिती मराठी (दुसरे मुख्यमंत्री) – Marotrao Kannamwar Information in Marathi

  • पूर्ण नाव : मारोतराव सांबशिवपंत कन्नमवार
  • जन्म : १० जानेवारी १९००
  • मृत्यू : २४ नोव्हेंबर १९६३
  • कार्यकाल : २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३

मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते.

मारोतराव कन्नमवार यांचा जन्म

मारोतराव कन्नमवार यांचा जन्म १० जानेवारी १९०० रोजी चंद्रपूर येथे झाला. ते सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय नेते होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून मूळ सावली विधानसभा मतदारसंघातून विधान मंडळावर १९५७ मध्ये पुन्हा विधानसभेवर निवडून आले.

मारोतराव कन्नमवार यांची राजकीय कारकीर्द

१९६२ च्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा मूळ सावली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. १९६२-६३ या कालावधीत ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत ओझरचा मिग विमानांचा कारखाना (नाशिक), वरणगाव-भंडारा व भद्रावती येथील संरक्षण साहित्य उत्पादनांचे कारखाने सुरू केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रयत्न केला. संरक्षण निधीसाठी त्यांनी त्याकाळी खूप मोठी रक्कम जमा केली.

मारोतराव कन्नमवार यांचा मृत्यू

मुख्यमंत्री पदावर असताना २४ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांच्या कार्यालयात त्यांचा अचानक मृत्यू झाला.

पुढे वाचा:

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

Leave a Reply