Set 1: माझा आवडता खेळ कबड्डी निबंध मराठी – Maza Avadta Khel Kabaddi Nibandh in Marathi

कबड्डी हा मैदानी खेळ आहे. मला हा खेळ जास्त आवडतो. कारण हा खेळ खेळायला कोणत्याही प्रकारचे साहित्य लागत नाही. त्यामुळे गरीब मुलेसुद्धा हा खेळ खेळू शकतात. दुसरे म्हणजे ह्या खेळात बऱ्याच मुलांना एकावेळी सहभागी होता येते. हा खेळ खेळताना कबड्डी कबड्डी,” हुतुतु हुतुतु’ असे म्हणत प्रतिपक्षाच्या हद्दीत चाल करून जाताना अंगात खूप जोर येतो.

दुसऱ्या पक्षातील खेळाडूला बाद करणे हे एक आव्हान असते. प्रतिपक्षातील खेळाडूंनी पकडले तर त्यांच्या हातून सुटून येण्यासाठी अंगात चपळता असावी लागते. कबड्डीत आणखी एक गंमत आहे. ती अशी की, एकाच वेळी खूप गडी बाद होऊ शकतात. किंवा बाद झालेले पुन्हा खेळू शकतात. त्यामुळे कोणाचा जय होणार हे खेळ संपेपर्यंत सांगता येत नाही. हा खेळ खेळल्याने खूप व्यायाम होतो. ह्या खेळासाठी काही आवश्यक गुण लागतात. ते म्हणजे अंगात चपळता, धाडस, समयसूचकता.

Set 2: माझा आवडता खेळ कबड्डी निबंध मराठी – Maza Avadta Khel Kabaddi Nibandh in Marathi

जगात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धा भरवल्या जातात. क्रिकेट व फुटबॉल, टेनिस यांसारखे खेळांच्या स्पर्धा जगभरातील लोक आवडीने पहातात. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल कितीही लोकप्रिय खेळ असले तरी माझा प्रिय खेळ कबड्डी आहे. हा खेळ आजही गावांत, गल्लीत, शहरातील शाळेत खेळला जातो. प्रत्येक खेळाप्रमाणे कबड्डीत मनोरंजनाबरोबरच व्यायाम पण होतो. अन्य खेळांप्रमाणे याला भारी खेळाच्या सामानाची गरज नसते. भारतात प्राचीन काळापासून कबड्डी हा लोकप्रिय खेळ आहे. कबड्डीसाठी फक्त एक क्रीडांगण पाहिजे जे आयताकार साडेबारा मीटर लांब व दहा मीटर रुंद असावे.

हा सांघिक खेळ आहे. यात दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२/१२ खेळाडू असतात. दोन्ही संघांचे खेळाडू भिन्न रंगाचे वेश घालतात. त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या संघाचा आहे हे ओळखता येते. दोन्ही संघांचे संघ कॅप्टन असतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंचा एकमेकांशी परिचय करून दिला जातो. नाणेफेक करून टॉस केला जातो. नंतर सामना सुरू होतो.

नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम दुसऱ्या संघावर आक्रमण करतो. परंतु सगळे खेळाडू एकदमच मैदानावर येत नाहीत. आधी सात खेळाडू मैदानात येतात. सर्वात आक्रमक खेळाडू कबड्डी कबड्डी म्हणत विरोधी संघाकडे जातो. आणि त्यातील खेळाडूंना स्पर्श करून दम न सोडता. नियमांचे उल्लंघन न करता आपल्या भागात परत येतो. जर तो सुरक्षित परतला तर विरोधी संघाच्या जितक्या खेळाडूंना त्याने स्पर्श केला ते सगळे बाद समजले जातात. जितके खेळाडू बाद होतात तितके गुण विजयी संघाला मिळतात. जर खेळाडू विरोधी भागात असेल आणि त्याचा दम मध्येच सुटला तर तो खेळाडू बाद मानला जातो. तसेच विरुद्ध भागात आलेल्या खेळाडूला त्या संघाचे सर्व खेळाडू मिळून पकडण्याचा व बाद करण्याचा प्रयत्न करतात. खेळाचा अवधी ५० मिनीटांचा असतो. जिंकलेल्या संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करतात.

कबड्डीद्वारे शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास पण होतो. नियमानुसार खेळल्यामुळे शिस्त आणि नियम पाळण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. शाळा-महाविद्यालयांत या खेळाचे महत्त्व वाढत आहे. राष्ट्रीय पातळीवर पण कबड्डीचे सामने होतात. लवकरच या खेळाला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळेल.

माझा आवडता खेळ कबड्डी निबंध मराठी – Maza Avadta Khel Kabaddi Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply