Set 1: माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी – Maza Avadta Khel Kho Kho Nibandh Marathi

खो-खो हा माझा आवडता खेळ आहे. आमच्या घराजवळ एक मैदान आहे. आम्ही मित्र रोज तेथे खो-खो खेळतो. आम्ही एक संघ स्थापन केला आहे. ‘बालमित्र खो-खो संघ’ हे त्याचे नाव आहे. मी या संघाचा कर्णधार आहे.

खो-खो हा खेळ मैदानात खेळतात. हा खेळ खेळण्यासाठी कोणतेही साहित्य लागत नाही. त्यामुळे सर्व मुले हा खेळ खेळू शकतात. या खेळात दोन संघ असतात.

प्रत्येक संघात नऊ खेळाडू असतात. एका संघातील खेळाडू बसतात. त्यांच्याभोवती दुसऱ्या संघातील खेळाडू पळत असतात. त्यांना बसलेल्या संघातील खेळाडू पकडतात. पकडलेला खेळाडू बाद होतो.

माझे काका आम्हांला खेळातील युक्त्या सांगतात. आम्हांला खूप सराव करायला लावतात. मी अनेक खेळाडूंना पटापट बाद करतो. मला मात्र कोणी पटकन बाद करू शकत नाही. त्यामुळे आमचा संघ नेहमी जिंकतो. मी मोठा झालो की, महान खो-खोपटू होणार! .

Set 2: माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी – Maza Avadta Khel Kho Kho Nibandh Marathi

लहान मुलांना खेळ खूप प्रिय असतो. साहजिकच मलाही खेळ खूप आवडतात. माझे बाबा म्हणतात की मुलांनी भरपूर खेळले पाहिजे. अंगमेहनत केली पाहिजे. त्यामुळे शरीरात ताकद येते, स्नायू बळकट होतात आणि मुलांची वाढही चांगली होते.

मला खो खो हा खेळ खूप आवडतो. ह्या खेळामध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. त्यापैकी एका वेळेस नऊ खेळाडू मैदानात उतरतात. खोखोचे मैदान आयताकृती आखलेले असते. भाग घेणारी मुले गुडघ्यावर खाली बसतात. एका आड एक खेळाडू विरूद्ध दिशेला तोंड करून बसतो. दोन्ही संघापैकी जो संघ कमीत कमी वेळात दुस-या संघातील सर्व खेळाडूंना खो देण्यात यशस्वी होतो तो संघ जिंकतो.

आमची शाळा आंतरशालेय खोखो स्पर्धांमध्ये भाग घेते आणि आम्हाला बरेचदा फिरती ढालही मिळते. मी शाळेच्या खोखोच्या संघात आहे. आम्ही जिंकलो की सर्वांना खूप आनंद होतो. रोज सकाळी मी शाळेत खोखोच्या सरावासाठी जातो. खोखो खेळल्यामुळे अभ्यास मागे पडला असे कुणी म्हणू नये म्हणून मी रात्रीच अभ्यास करून ठेवतो.

असा आहे माझा आवडता खेळ-खो खो.

Set 3: मी पाहिलेला खेळ खो खो निबंध मराठी – Mi Pahilela Khel Kho Kho Nibandh Marathi

परवा आमच्या गावात खो-खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, फुटबॉल, हॉकीचे सामने झाले. बऱ्याच दिवसांनी सामने होत असल्याने सामने पहायला प्रेक्षकांनी ही गर्दी केली होती. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते की पहाण्याऱ्याने चकित व्हावे. जळाडू देखील उत्तेजित झाले होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ते एका बाजूला सराव करीत होते. काही खेळाडू शर्यतीसाठी रिंगणात उतरले होते.

खो-खो चा सामना चालू झाला. दोन्ही संघ एकमेकांना फितविण्याचा, चुकवण्याचा प्रयत्न करत होते. एक संघ बसला होता व दुसरा संघ पळण्यासाठी तयार होता. पहिली जोडी पळू लागताच शिट्या वाजवून अम्पायरनी खेळ सुरु झाल्याची सुचना केली. प्रेक्षकांनी ही टाळ्या वाजवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. दोन्ही संघ तयारीचे होते. शेवटी रस्सीखेच सुरु झाली.

नंतर बसलेला संघ पळू लागला व पळणारा संघ बसला शेवटी एक संघ विजयी झाला. विजयी संघाचे कौतुक झाले. नंतर कबड्डीसाठी दुसरे दोन संघ मैदानात उतरले. एक संघ पुण्याचा व दुसरा संघ मुंबईचा होता. दोन्ही संघ एकमेकाला चितपट करत होते. प्रेक्षकदेखील श्वास रोखून बसले होते. दोन्ही संघ सेमी फायनलमध्ये सरस ठरले होते. फायनलला मुंबईच्या संघाने २-३ अशी पुणे संघावर मात कर विजय प्रस्थापित केला. त्यामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत आनंदोत्सव साजरा केला.

बक्षिस समारंभाच्या वेळी अध्यक्षांनी अभिनंदनपर भाषण केले. त्यात त्यांनी दोन्ही संघांचे कौतुक केले. बक्षिसे वाटण्यात आली. पराभव झालेले संघही आपला पराभव विसरुन कौतुक सोहळ्याला उपस्थित राहिले. कारण त्यांच्यामुळेच विरुद्ध संघ विजय मिळवू शकला. ‘शिवाय पराजय ही यशाची पहिली पायरी ‘सते’ या उक्तीनुसार, पुढच्यावेळी आपणही पुन्हा यशस्वी होवू अशी खात्री त्या संघाला वाटत होती.

माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी – Maza Avadta Khel Kho Kho Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply